पुणे: महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी रास्तापेठ येथील पुणे परिमंडलाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालय सुरु करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.
धकाधकीच्या क्षेत्रामध्ये अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुस्तकाच्या रुपाने नवीन मित्र मिळावे, वाचनकला विकसित व्हावी तसेच जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने रास्तापेठ येथे स्वतंत्र दालनात ‘ज्ञानऊर्जा’ वाचनालय उभारण्यात आले आहे. यामध्ये वीजक्षेत्रासह सामाजिक, ऐतिहासिक तसेच विविध क्षेत्रातील नामवंत लेखकांचे पुस्तके, कथासंग्रह, कादंबरी उपलब्ध आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पुस्तके वाचण्यासाठी घरी नेता येणार आहे. तसेच वाचनालयाशेजारी विरंगुळा कक्ष असून त्यात कॅरम व बुद्धीबळ खेळण्यासाठी उपलब्ध आहे. या शिवाय वाहन चालकांसाठी वाहक कक्ष उभारण्यात आला आहे.
या तिनही उपक्रमांचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, संजीव नेहेते, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे, कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, विरेंद्र मुळे, रवींद्र बुंदेले, माणिक राठोड, चंद्रकांत दिघे, सहायक संचालक गजानन खेडेकर आदींची उपस्थिती होती.