पुणे- पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,’हडपसर येथील भाजपचे नेते आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे दोन दिवसापूर्वी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती.तर या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून सतीश वाघ यांचे शेजारी राहणार्या व्यक्ती सोबत काही दिवसापूर्वी वाद झाला होता.त्यातून सतीश वाघ यांना मारण्यासाठी 5 लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती.ही माहिती तपासात समोर आली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून “वैयक्तिक” कारणातून झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश वाघ यांना मारण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी 5 पैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली, त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेच्याबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.