पुणे-अवैद्य गावठी हातभट्टी दारूच्या दोन भट्टया उध्वस्त करुन, त्या मधील ४,३४० लिटर गावठी हातभट्टी दारु व गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १२,००० लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन पकडुन ९,२७,५००/-रु.कि.चा मुद्देमाल काळेपडळ पोलीसांनी हस्तगत केला. आणि दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०६/१२/२०२४ व दिनांक ०७/१२/२०२४ रोजी काळेपडळ कडील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, परि-पोलीस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलीस हवालदार , परशुराम पिसे, संजय देसाई, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, औताडवाडी, स्मशान भूमीच्या पश्चिमेस, ओढ्यालगत वडाचीवाडी पुणे व सर्व्हे नं.१३/२ ओढयालगत वडाचीवाडी पुणे येथे दोन इसम हे गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत. अशा मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व वर पोलीस स्टाफ यांनी वर दोन ठिकाणी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली.
या छापा कारवाई मध्ये दारु गाळणारेदोघांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नावे १) जगदीश भैरुलाल प्रजापती, वय २४ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे २) गुलाब संपकाळ रचपुत वय ३३ वर्षे, रा. पिजनवस्ती, होळकरवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणा वरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण १२४ कॅन व १२,००० लिटर कच्चे रसायनसह दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ९,२७,५००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्या बाबत कोढवा पोलीस ठाणेस गु.र.नं.१३३२/२०२४ मा.न्या.सं. कलम १२३ सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, अनिल निंबाळकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ .५ आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मागदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, .मानसिंग पाटील, यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, परि-पोलीस उप निरीक्षक, अनिल निबाळकर, पोलीस हवा, परशुराम पिसे, संजय देसाई, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केली आहे.
अवैद्य गावठी हातभट्टी दारूच्या दोन भट्टया उध्वस्त, सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक
Date:

