चंपाषष्ठी निमित्त स्वरूपा परिवारच्या वतीने १० बाय १० फूट आकारातील रेखीव सजावट
पुणे : जुन्या पुण्यातील वाडा संस्कृती ते नव्या इमारतीपर्यंत यशस्वीतेचा प्रवास १० बाय १० फूट आकारातील रेखीव सजावटीतून कसबा पेठेत साकारण्यात आला आहे. शिंदे परिवार तर्फे ४४५ कसबा पेठ नवदीप मंडळ येथील श्री खंडोबा देवस्थान येथे ही सुरेख प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

चंपाषष्ठी निमित्त स्वरूपा परिवार यांचे वतीने ही प्रतिकृती व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. परिवाराचे संस्थापक तुषार शिंदे यांची संकल्पना असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव प्रमुख शिवेनदादा शिंदे, व प्रसाद कारंजकर, अभि निजामपूरकर, ओंकार कवळे, गणेश चव्हाण, श्रीनिवास सातव,विशाल दाभेकर, ज्ञानेश्वर पवार, रविंद्र शिंदे, श्रीनिवास टेमगिरे, प्रतीक भुजबळ, नितीन होले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तुषार शिंदे म्हणाले, हा वाडा ८४ वर्षांपासून इथे अस्तित्वात असून खंडोबाचा उत्सव आम्ही सन २००७ पासून साजरा करतो. यंदा आमचा शिंदे परिवाराचा खंडोबाचा कृपने झालेला वाडा संस्कृती ते नव्या इमारतीपर्यंतचा यशस्वी प्रवास प्रतिकृतीच्या माध्यमातून मांडला आहे. यामध्ये वाडयातील सर्व खोल्या, चौक, जिने यापासून ते सुसज्ज इमारत हुबेहूब साकारण्यात आली आहे.
तसेच श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान, पाल (पेंबर) येथील प्रवेशद्वार व मंदिर देखील साकारण्यात आले आहे. तब्बल १५-२० दिवसांपासून आम्ही प्रतिकृतीसाठी तयारी केली. चंपाषष्ठी निमित्ताने असंख्य भाविकानी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभरात श्रींचा अभिषेक, भजन, श्री सत्यनारायण पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

