पुणे, ६ डिसेंबर २०२४: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच निर्णयात आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल सह्याद्रि हॉस्पिटल्स माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानत आहे. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) उपचार घेत असलेल्या रुग्णाला आधार देण्याचा हा दयाळू आणि परिणामकारक निर्णय नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतूट बांधिलकीचा पुरावा देणार आहे.
सह्याद्रि नगररोड सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल असलेल्या चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे या रुग्णासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत.यावेळी सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री. अब्रारअली दलाल यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “सह्याद्रि हॉस्पिटल्स आणि संपूर्ण आरोग्य सेवा समुदायाच्या वतीने, मी माननीय मुख्यमंत्र्यांचे, त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि आरोग्य सेवेच्या समर्पणाबद्दल आभार मानू इच्छितो. बीएमटी उपचार घेत असलेल्या रुग्णाला वेळेवर आधार देणे हे केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी आशादायक ठरत नाही तर सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेचे महत्त्व देखील अधोरेखित करते.”
बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही रक्ताचा कर्करोग आणि अनुवांशिक विकारांसारख्या गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या अनेक रुग्णांसाठी एक जीवदान देणारी प्रक्रिया आहे. अशा गंभीर आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करून मुख्यमंत्र्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दलची सखोल जाण दाखवली आहे.
“गरजू रुग्णांना प्रगत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सरकारसोबत भागीदारी करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे उपचारासाठी दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची सर्वोत्कृष्ट काळजी घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी धोरणकर्त्यांसोबत हातमिळवणी करून काम करण्यास आम्ही कायमच कटिबद्ध आहोत.” श्री. अब्रारअली दलाल पुढे म्हणाले.
हा ऐतिहासिक निर्णय अनेकांसाठी आशेचा किरण आहे. आणि राज्यभरातील आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि सेवांना बळकटी देण्याच्या उद्देशाने भविष्यातील उपक्रमांसाठी एक भक्कम आदर्श ठेवणारा आहे.

