मुंबई, दिनांक 6 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 06 डिसेंबर, 2024 रोजी विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा.श्री.राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा.डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
त्यानंतर, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल,” अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजभवनात बाबासाहेबांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, अवर सचिव श्री. विजय कोमटवार, मा. उपसभापती यांचे खाजगी सचिव श्री. रविंद्र खेबुडकर, संचालक वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
राजभवनात प्रोटेम विधानसभा अध्यक्षांच्या शपथ प्रसंगी नीलमताई गोर्हे गेल्या होत्या त्याआधी त्यांनी गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.