Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

क्रिसिलने वेदांताचे क्रेडिट रेटिंग अपग्रेड करून “AA” केले  

Date:

पुणे-

क्रिसिलने वेदांताच्या दीर्घकालीन बँक सुविधा आणि डेट इन्स्ट्रुमेंट्सचे रेटिंग ‘AA-’ वरून ‘AA’ केले असून लघुकालीन रेटिंग A1+ ला दुजोरा दिला आहे.

रेटिंग अपग्रेडमधे एकूण ऑपरेटिंग नफ्यात (व्याज, कर, घट आणि कर्जमाफीपूर्व (ईबीआयटीडीए) मिळकत) वेदांताची अपेक्षित सुधारणा तसेच डेटमध्ये घट आणि सुधारित भांडवल आराखडा झाल्याचे क्रिसिलने आपल्या रेटिंग अहवालात म्हटले आहे.

क्रिसिलने असेही नमूद केले आहे की वेदांताचा एकूण ऑपेरिंटग नफा (ईबीआयटीडीए,ब्रँड आणि व्हीआरएलप्रती व्यवस्थापन शुल्क वगळता)आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४५,००० करोड रुपयांपेक्षा जास्त असण्याची  शक्यता असून त्याला प्रामुख्याने अल्युमिनियम,झिंक इंटरनॅशनल आणि लोखंडमध्ये वोल्युम ग्रोथ  तसेच झिंक व अल्युमिनियमची सुधारित किंमत क्षमता व धातूंच्या सर्वसाधारण किंमती यांचाही लाभ होईल.आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ईबीआयटीडीए(EBITDA) आणखी सुधारण्याची अपेक्षा असून त्याला सध्या क्षमता वाढवण्यासाठी आणि विशेषतः अल्युमिनियमधील कार्यकारी क्षमतेसाठी सुरू असलेल्या भांडवली खर्चाच्या पूर्णत्वाची जोड मिळेल.

गेल्या तीन महिन्यांत प्रमुख क्रेडिट एजन्सीने अपग्रेड देण्याची वेदांताची ही दुसरी वेळ आहे. सप्टेंबर महिन्यात आयसीआरएने वेदांता लिमिटेडचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग AA- वरून AA वर नेले आणि त्यातून कंपनीची सशक्त क्रेडिट प्रोफाइल दिसून येत आहे.

कमॉडिटी व्यवसायात चक्रीयता सहन करण्याची वेदांताची क्षमता तसेच उत्पादनाचा कमी खर्च हे घटकही रेटिंग एजन्सीने अधोरेखित केले आहेत. ‘वेदांता समूह विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असून त्यात झिंक, शिसे, चांदी, अल्युमिनियम, तेल आणि वायू, लोखंड, उर्जा व स्टील यांचा समावेश आहे. हा समूह या सर्व क्षेत्रांतील सर्वात आघाडीचा उत्पादक असून देशांतर्गत बाजारपेठेत समूहाने मजबूत स्थान मिळवले आहे. वैविध्यपूर्ण व्यावसायिक जोखीम समूहाला कमॉडिटीशी संबंधित जोखीम आणि चक्रीयतेपासून सुरक्षित ठेवते,’ असे क्रिसिलने नमूद केले आहे.

क्रिसिलने रेटिंगमध्ये वेदांता व्यवसायाचे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलवर (एनसीएलटी) स्वतंत्र नोंदणीकृत कंपन्यांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावाचीही नोंद घेत विभाजनच्या यशस्वी पूर्णत्वाची शक्यता वाढली आहे, असे म्हटले आहे.

वेदांताच्या युकेस्थित पेरेंट कंपनी – वेदांता रिसोर्सेस लिमिटेडलाही (व्हीआरएल)नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रेडिट एजन्सीकडून अपग्रेड मिळाले आहे.अमेरिकास्थित मूडीजने  व्हीआरएलचे कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग B3 वरून B2 केले आहे आणि कंपनीच्या सीनियर अनसिक्युअर्ड बाँड्सचे रेटिंग Caa1 वरून B3 केले आहे. त्याशिवाय गेल्या महिन्यात फिचने व्हीआरएलचे पहिल्यांदाच B-  रेटिंग सकारात्मक दृष्टीकोनासह प्रकाशित केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेसाठी आप ने मारली बाजी… २५ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर

पुणे- पुण्यातील राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने...

यावेळी निवडणुकीत: दुबई धमाका .. ज्युपिटर धमाका … ‘जागर स्त्री शक्तीचा, खेळ सौभाग्यवतीचा’ हे ग्रँड आकर्षण

पुणे - महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी अनेक माजी नगरसेवक...

स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला!

हिंगोली - काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी...