पुणे (प्रतिनिधी): भारताच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या संमिश्र संस्कृतीचा आढावा आणि मूल्यांचा गौरव, त्यांचं विश्लेषण या सर्वांचा सारांश म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू लिखित “भारताचा शोध” हे पुस्तक असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक, प्रख्यात विद्वान आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. अपूर्वानंद यांनी केले. निमित्त होते लोकायत, ज्ञानभारती प्रतिष्ठान आणि ALERT आयोजित ‘भारत एक खोज’ या व्याख्यानमालेतील नेहरू के रस्ते या पहिल्या व्याख्यानाचे. हे व्याख्यान रविवार, 1 डिसेंबर 2024 रोजी सायं 6 वा. पत्रकार भवन येथे झाले. पुढे ते म्हणाले कि
अठरापगड जाती जमाती, विविध धर्म असून सुद्धा भारताला एकसंध बांधून ठेवलं ते संवादाने हि शिकवन महात्मा गांधी पासून ते जवाहरलाल नेहरू यांनी आपल्याला दिली आहे संवादाची भाषा जर खऱ्या अर्थाने जपली तरच लोकशाही जिवंत राहील हाच विचार नेहरू यांनी दिला आहे. एकमेकांना जर आपण समजून घेत नसेल तर नवीन समाज निर्माण करू नाही शकणार अशा विचारसरणीमुळेच आंतरराष्ट्रीय जगात नेहरूंची स्वंतत्र ओळख बनली होती
भाषेच्या आनंदासाठी तरी कमीत कमी भारत एक खोज हे नेहरू लिखित पुस्तक सर्वांनी वाचायला पाहिजे असं आवाहन प्रा. अपूर्वानंद यांनी केलं.
भारतातील विविध परंपरा, भाषा, पेहराव, खाद्य नक्की काय होत्या हे आजच्या तरुणाईने समजून घेणं या उद्देशाने या व्याख्यानमालेच आयोजन केलं अस कार्यक्रमाचे समन्वयक नीरज जैन यांनी सांगितले.