हिंजवडी, २ डिसेंबर,२०२४: केनडियर, कल्याण ज्वेलर्सचा हा ब्रँड ट्रेंडी व आधुनिक डिझाइन्ससाठी सुप्रसिद्ध आहे. या लाइफस्टाइल ज्वेलरी ब्रँडने हिंजवडीमध्ये आपले नवीन शोरूम सुरु केले आहे. पुण्यामध्ये हिंजवडीच्या गजबजलेल्या टर्मिनल वन भागात सुरु करण्यात आलेले हे पुणे शहरातील दुसरे आणि भारतातील ४९ वे केनडियर स्टोर आहे.
वजनाला हलके, बहुउपयोगी आणि जेन झेड, नोकरी–व्यवसाय करणाऱ्या महिला आणि फॅशन–फॉरवर्ड पुरुषांची आवडनिवड, गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलेले दागिने ही केनडियरची ओळख आहे. याठिकाणी प्रत्येक दागिन्यांमध्ये आधुनिक स्टाईल आणि परवडण्याजोग्या किमती यांची सांगड घालण्यात आली आहे, ग्राहकांसाठी हे दागिने म्हणजे स्व–अभिव्यक्तीचे सहजसोपे माध्यम आहेत. फक्त १०,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या किमती असलेल्या केनडियर कलेक्शनमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेत, विचारपूर्वक दिली जाणारी भेट म्हणून, प्रत्येक प्रसंग कायमचा आठवणीत राहावा यासाठी हे दागिने अगदी सुयोग्य आहेत.
हिंजवडीमध्ये नवीन शोरूमचे उदघाटन ब्रँड विस्तार आणि वृद्धीबरोबरीनेच ग्राहकांसाठी आग्रहाचे आमंत्रण आहे की त्यांनी याठिकाणी येऊन अशा दागिन्यांच्या खरेदीचा आनंद घ्यावा ज्यांना शैली आणि अर्थ यांचा मिलाप करून तयार करण्यात आले आहे. हे स्टोर आपल्याला एका नव्या जगात घेऊन जाते, याठिकाणी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व, आवडनिवड, जीवनशैली यांना अनुरूप दागिने मिळतात.
नवीन स्टोरच्या निमित्ताने केनडियरने एका विशेष लॉन्च ऑफरची देखील घोषणा केली आहे. डायमंड मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंतची सूट, सर्वात कमी गोल्ड रेट, गोल्ड मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंतची सूट आणि प्लॅटिनम मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंतची सूट मिळवण्याची सुवर्णसंधी ब्रँडने उपलब्ध करवून दिली आहे. सॉलिटेयर खरेदी करायचे असतील तर स्टोनच्या किमतींवर ३०% पर्यंतची सूट देखील मिळू शकते. आधुनिक दागिन्यांची नवी व्याख्या रचणारे आणि ऑफर्सना अजूनचबनवणारे कलेक्शन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.
डिजिटल–फर्स्ट ब्रँड ते ओम्नीचॅनेल रिटेलरपर्यंतच्या या प्रवासात, केनडियरने आपल्या ग्राहकांना, ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अतिशय सुविधाजनक खरेदी अनुभव प्रदान करण्याची बांधिलकी कायम राखली आहे. कल्याण ज्वेलर्सच्या मजबूत समर्थनासह केनडियरने आपले विस्ताराचे आणि सजावटीबरोबरीनेच वैयक्तिक स्टाईल व स्वयं–अभिव्यक्तीचा अभिन्न भाग बनणारे दागिने प्रस्तुत करण्याचे मिशन सुरु ठेवले आहे.
हिंजवडीमध्ये नवीन स्टोरसह, केनडियरने ग्राहकांना वेगवेगळी आवडनिवड पूर्ण करणारे, अतिशय आकर्षक आणि अनोखे दागिने प्रस्तुत करण्याची बांधिलकी कायम राखली आहे, याठिकाणी प्रत्येक दागिना स्टाईलची कहाणी सांगतो आणि तुमच्या जीवनातील खास क्षणांचा अविभाज्य भाग बनतो.