निवडणुका हायजॅक केल्या जात आहे-रविंद्र धंगेकर यांची सरकारवर टीका

Date:

डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष उपोषणाला पाठिंबा

पुणे-
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुदतीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असे सांगण्यात आले होते. मुदत उलटली तरी राष्ट्रपती राजवट लागू केली नाही. निवडणूक आयोगासह सर्व केंद्रीय यंत्रणा सरकारच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. निवडणुकासुद्धा हायजॅक केल्या जात आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शनिवारी केली.

लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाला शनिवारी रविंद्र धंगेकर यांनी भेट देवून पाठिंबा दर्शवला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र धंगेकर म्हणाले, निवडणूक यंत्रणा हाताशी धरून लोकशाहीची झालेली चिरफाड संपूर्ण महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या सर्वांना संघर्षाचे आवाहन करत ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी त्यांची भेट घेवून यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्यासह संविधानावर श्रद्धा असलेला, लोकशाहीवर विश्वास असलेला प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी आहे.

गेल्या १० वर्षांत लोकशाहीला घातक वातावरण देशात निर्माण झाले आहे. हुकुमशाही लादली जात आहे. वैयक्तिक हल्ले, जातीयवादी आणि विषारी प्रचार केला जात आहे. जे ऐकत नाहीत त्यांना इडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. वैभवशाली भारताची लोकशाही संपवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने लोकशाहीच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे, असे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...