पुणे दिनांक ३० डिसेंबर
नील मुळ्ये, ईशान खांडेकर, समृद्धी कुलकर्णी,जान्हवी फणसे व नैशा रेवसकर
यांच्याकडे आगामी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे पुण्याच्या वेगवेगळ्या संघांची निवड आज येथे जाहीर करण्यात आली. ही स्पर्धा दोन डिसेंबर पासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे.
डावखुरा राष्ट्रीय खेळाडू नील मुळ्ये याच्याकडे आगामी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुरुष व १९ वर्षाखालील मुले या दोन संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाचे कर्णधारपद ईशान खांडेकर याच्याकडे देण्यात आले आहे. या सर्व संघांचे प्रशिक्षक म्हणून दीपक कदम यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
समृद्धी कुलकर्णी (कर्णधार) हिच्याकडे महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून १९ व १७ वर्षाखालील मुलींच्या संघाचे कर्णधारपदी अनुक्रमे जान्हवी फणसे व नैशा रेवसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व संघांचे प्रशिक्षक म्हणून अमित ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा संघातील खेळाडू याप्रमाणे-
पुरुष अमिष आठवले, नील मुळ्ये (कर्णधार), जय पेंडसे, भार्गव चक्रदेव, शुभंकर रानडे,
१९ वर्षाखालील मुले-नील मुळ्ये (कर्णधार), अमिष आठवले, प्रणव घोलकर, ईशान खांडेकर
१७ वर्षाखालील मुले ईशान खांडेकर (कर्णधार) शौरेन सोमण, कौस्तुभ गिरगावकर प्रणव घोलकर
महिला-समृद्धी कुलकर्णी (कर्णधार),धनश्री पवार, स्वप्नाली नराळे, वैष्णवी देवघडे, तितिक्षा पवार.
१९ वर्षाखालील मुली- जान्हवी फणसे (कर्णधार), तनया अभ्यंकर, साक्षी पवार, श्रिया शेलार
१७ वर्षाखालील मुली- नैशा रेवसकर (कर्णधार), सई कुलकर्णी, तनया अभ्यंकर जान्हवी फणसे.
प्रशिक्षक-अमित ठाकूर

