पुणे दिनांक २९ नोव्हेंबर
पुणे जिल्हा संघांमधील सर्वच खेळाडूंनी यंदाच्या मोसमातील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यामुळे आगामी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतही ते पुण्याचा नावलौकिक उंचावतील असा आत्मविश्वास बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय भालचंद्र यांनी व्यक्त केला. राज्य स्पर्धा दिनांक २ डिसेंबर पासून पुण्यात आयोजित केली जाणार आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने
पुणे जिल्ह्याच्या ११, १३, १५ वर्षाखालील मुले व मुलींच्या संघांची निवड करण्यात आली असून. या संघांचे सराव शिबिर शारदा सेंटर येथे सुरू झाले आहे.या शिबिरास बालुफ ऑटोमेशन कंपनीचे प्रायोजकत्व लाभले आहे.
बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय भालचंद्र यांनी या शिबिरास भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. ते स्वतः राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांनी महत्त्वाच्या क्षणी खेळावर कसे नियंत्रण ठेवावे याबाबत बहुमोल मार्गदर्शनही केले. यावेळी जिल्हा संघटनेचे आशिष बोडस, सौ स्मिता बोडस, प्रशिक्षक सुरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.
हे शिबिर पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने शारदा स्पोर्ट्स सेंटरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. आगामी राज्य स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या खेळाडूंची कामगिरी सर्वोत्तम व्हावी या दृष्टीनेच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी असे शिबिर आयोजित केले जात असून त्याचा फायदा खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी झाला आहे.
शौरेन सोमण व नैशा रेवसकर
यांच्याकडे पुण्याचे नेतृत्व
आगामी राज्य स्पर्धेसाठी मुलांच्या संघाचे नेतृत्व शौरेन सोमण याच्याकडे सोपवण्यात आले असून प्रशिक्षकपदी वैभव दहिभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलींच्या संघाचे नेतृत्व नैशा रेवसकर हिच्याकडे देण्यात आले आहे आणि प्रशिक्षकपदाची जबाबदारी पवन कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे
पुण्याचे संघ-मुले
१५ वर्षाखालील – शौरेन सोमण (कर्णधार) श्रेयस माणकेश्वर, आदित्य सामंत, नील नवरे,
१३ वर्षाखालील- मोहील ठाकूर, धैर्य शहा, शारंग गवळी, नीरव मुळ्ये
११ वर्षाखालील मुले – वरदान कोलते, नभ पंचोलीया, सर्वेश जोशी, ऋग्वेद दांडेकर.
प्रशिक्षक- वैभव दहिभाते
मुली- १५ वर्षाखालील-नैशा रेवसकर कर्णधार, सई कुलकर्णी, आद्या गवात्रे, वेदांगी जुमडे.
१३ वर्षाखालील-नीरजा देशमुख श्रेया कोठारी दिया शिंदे शरण्या पटवर्धन.
११ वर्षाखालील-आहाना गोडबोले, स्पृहा गुजर, शरण्या पटवर्धन, श्रीनिका उमेकर
प्रशिक्षक – पवन कदम.