वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर तिकीट दरांवर 20% पर्यंत सूट
● सेलमधील तिकीट दर फक्त एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध
● सेल कालावधीत एअर इंडियाच्या वेबसाइट आणि अॅपवर कोणतेही सुविधा शुल्क नाही
● विविध पेमेंट पद्धतींवर अतिरिक्त बचत
गुरुग्राम, 29 नोव्हेंबर 2024: एअर इंडियाने आज मर्यादित कालावधीसाठी ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील फ्लाइट्ससाठी बेस फेअरवर 20% पर्यंत आणि अमेरिका, युरोप (युनायटेड किंगडमसह), ऑस्ट्रेलिया, दक्षिण-पूर्व आशिया, तसेच दक्षिण आशियाच्या फ्लाइट्ससाठी 12% पर्यंत सूट दिली जाईल. हा सेल केवळ एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि आयओएस व अँड्रॉइड मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.
सेलअंतर्गत बुकिंग 29 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 12:01 वाजता (IST) सुरू होतील आणि 2 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत (IST) उपलब्ध असतील. प्रवास 30 जून 2025 पर्यंत करता येईल (भारत ते ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिका यांमधील फ्लाइट्ससाठी प्रवास कालावधी 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे).
वेबसाइट आणि अॅपवर बुकिंगसाठी कोणतेही सुविधा शुल्क नाही
सेलच्या कालावधीत, एअर इंडिया आपल्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर बुक केलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी कोणतेही सुविधा शुल्क आकारणार नाही. यामुळे देशांतर्गत बुकिंगसाठी INR 399 आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगसाठी INR 999 पर्यंतची अतिरिक्त बचत होईल.
विविध पेमेंट ऑफर्ससह अतिरिक्त बचत
एअर इंडियाने प्रवाशांसाठी अनेक पेमेंट ऑफर्सद्वारे अतिरिक्त सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांना आणखी जास्त बचत करता येईल.
Payment Mode | Discount | Promo Code |
UPI | देशांतर्गत फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 400 पर्यंत बचतआंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 1200 पर्यंत बचत | UPIPROMO |
Internet Banking | देशांतर्गत फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 400 पर्यंत बचतआंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर प्रति प्रवासी INR 1200 पर्यंत बचत | NBPROMO |
ICICI Bank Credit Cards | राउंड-ट्रिप देशांतर्गत फ्लाइट्सवर INR 750 पर्यंत बचत | ICICI750 |
आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर INR 2500 पर्यंत बचत | ICICI2500 | |
बिझनेस क्लास बुकिंग्सवर INR 3000 पर्यंत बचत | ICICI3000 |
एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर इतर पेमेंट पद्धतीही स्वीकारल्या जातात. जसे की, भारतातील किंवा परदेशातील प्रमुख बँकांनी जारी केलेले डेबिट व क्रेडिट कार्ड्स, रुपे कार्ड्स आणि पेमेंट वॉलेट्स. या पद्धतींवर अतिरिक्त सवलत लागू होणार नाही.
विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी संभाव्य बचत
एअर इंडियाच्या विद्यमान सवलतींसह नवीन पेमेंट ऑफर्स व सुविधा शुल्कमाफीचा लाभ घेतल्यास, विद्यार्थी बेस फेअरवर 25% पर्यंत व ज्येष्ठ नागरिक 50% पर्यंत बचत करू शकतात.
सेल बुकिंग एअर इंडियाच्या थेट चॅनेल्सवर उपलब्ध
सेलअंतर्गत बुकिंग एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत. सेलमधील सीट्स मर्यादित असून, पहिल्यांदा बुक करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल (ब्लॅकआउट तारखा लागू होतील). भाडेदर विविध शहरांतील विनिमय दर आणि करांच्या आधारे किंचित बदलू शकतात.