चेन्नई: महिंद्रा कंपनीने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6e आणि XEV 9e च्या सादरीकरणासह इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नियमांना नव्याने परिभाषित केले आहे. ही वाहने अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर INGLO वर आधारित असून जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह माईंड MAIA ने सुसज्ज आहेत. या वाहनांमध्ये महिंद्राच्या “Unlimit India” या दृष्टिकोनाचा समावेश आहे. याठिकाणी भारतीय नवनिर्मिती आणि डिझाइन जागतिक मापदंडाना केवळ आव्हान देत नाही तर ते नवीन मानके निर्माणही करतात. BE 6e आणि XEV 9e यांची प्रारंभिक किंमत* आज जागतिक प्रीमियरमध्ये घोषित करण्यात आली.
जीवनशैली विषयक ब्रँडची निर्मिती करताना
महिंद्राचे ब्रँड धोरण ग्राहकांच्या आकांक्षांशी सुसंगत अनुभव प्रदान करणाऱ्या आणि त्यांच्या अमर्याद क्षमतेला नवा आयाम देणाऱ्या वाहनांच्या निर्मितीवर आधारित आहे. BE 6e हे स्पोर्टी, परफॉर्मन्स-ड्रिव्हन वाहन असून साहस, रोमांच आणि अचूकतेची अनुभूती देणाऱ्या साहसी व्यक्तिमत्त्वासाठी तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, XEV 9e ने अप्रतिम डिझाईन, आलिशानपणा यांची पुर्नव्याख्या केली असून त्यामध्ये अत्याधुनिक डिझाइन आणि आरामशीरपणा यांचा संगम आहे.
प्रगत श्रेणी, इंटेलीजंट राईड डायनॅमिक्स, अत्याधुनिक सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये आणि सिनेमॅटीक इन-केबिन अनुभव देणारी ही इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही केवळ वाहने नसून ठळक आणि प्रामाणिक, विश्वासार्ह जीवनशैलीचे प्रतीक आहेत.
भावनिक बंध निर्माण करणारे हार्टकोर डिझाइन
महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीज या हार्टकोर डिझाइन तत्वज्ञानाचे प्रतिक आहेत. दमदार नाविन्यपूर्णता आणि आधुनिक लक्झरी यांच्या माध्यमातून या गाड्या आपल्या मालकांशी भावनिक संबंध प्रस्थापित करतात. आकर्षक बाह्य रूप आणि विचारपूर्वक तयार करण्यात आलेले अंतर्गत डिझाईन यासह BE 6e आणि XEV 9e एसयूव्ही सुंदर डिझाइन आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड प्रस्थापित करतात. BE 6e चे एजी, अॅथलेटिक सिल्हूट आणि रेस-प्रेरित लवचिकता हे ठळक वैशिष्ट्य आहे तर XEV 9e हे SUV कूप डिझाइनमध्ये अत्याधुनिक लक्झरी आणि चांगली कामगिरी यांचे अनोखे मिश्रण सादर करते.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विजय नाकरा म्हणाले, “आमच्या ब्रँड कल्पनेमागील विचाराची प्रेरणा ही प्रेम या सर्वात शक्तिशाली मानवी भावनेवर आधारित आहे. प्रेम हे शाश्वत असते, आपल्या खोलवरच्या निवडींना प्रेरित करते आणि आपण कोण आहोत हे परिभाषित करते. आमच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6e आणि XEV 9e या अमर्याद प्रेमाविषयी आहेत. त्या आमच्या ग्राहकांना जीवनरसाने, चैतन्यपूर्ण अनुभवांनी भरलेले, मर्यादाविरहित जीवन जगण्याची प्रेरणा देतील. अद्वितीय स्थान, अतुलनीय तंत्रज्ञान आणि उत्तम कामगिरीसह तयार केलेल्या या एसयूव्हीज जागतिक मापदंड प्रस्थापित करतील. कामगिरी आणि ज्यांना वेग, रोमांच आणि साहसाची अनुभूती घेण्याची आवड आहे अशा लोकांसाठी एजी, अॅथलेटिक सिल्हूट आणि रेस-प्रेरित लवचिकता असलेली BE 6e डिझाइन करण्यात आली आहे तर XEV 9e हे SUV कूप डिझाइनमधील अत्याधुनिक लक्झरी आणि चांगली कामगिरी यांचे अनोखे मिश्रण सादर करते.”
महिंद्रा & महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक आर. वेलुसामी म्हणाले, “BE 6e आणि XEV 9e ही अत्याधुनिक भारतीय आयकॉनिक उत्पादने असून ती जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवतील. मेड-इलेक्ट्रिक वाहन आणि ही दोन बॉर्न इलेक्ट्रिकSUV यामधील फरक असा आहे की एक आपण यापूर्वी पाहिले आहे आणि दुसरे याआधी कधीच पाहिलेले नाही. कामगिरीच्या बाबतीत एक जेमतेम उद्योगक्षेत्रातील मानकांशी जुळणारे आहे तर दुसऱ्या प्रकाराने उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत. एक तंत्रज्ञानाने भरलेले आहे जे लवकरच इतिहासजमा होईल, तर दुसऱ्यामध्ये असे तंत्रज्ञान देते जे इतर सर्व गोष्टींना इतिहासजमा बनवेल. INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर वर आधारित आणि जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह माईंड MAIA द्वारा सुसज्ज ही उत्पादने महिंद्राच्या Unlimit India या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात आणि नवीन जागतिक मापदंडे स्थापित करतात.”
INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर
· BE 6e साठी 682 किमी (MIDC P1+P2) आणि XEV 9e साठी 656 किमी (MIDC P1+P2) प्रमाणित रेंज, 79 kWh प्रगत LFP बॅटरी पॅकसह.
· 79 kWh आणि 59 kWh बॅटरी पॅकसाठी आजीवन बॅटरी वॉरंटी. ही वॉरंटी फक्त पहिल्या नोंदणीकृत मालकांसाठी लागू आहे आणि फक्त खाजगी नोंदणीवरच वैध आहे. मालकी बदलल्यास, हाय व्होल्टेज बॅटरीची वॉरंटी वाहनाच्या पहिल्या वितरणाच्या तारखेपासून 10 वर्षे किंवा 2,00,000 किमी, जे आधी असेल त्यापर्यंत मर्यादित असेल. पूर्ण तपशील बुकिंगच्या वेळी उपलब्ध असतील.
· 210 kW पर्यंत पॉवर वितरीत करणारे 3-इन-1 इंटीग्रेटेड पॉवरट्रेन
· BE 6e साठी 0-100 किमी/तास साठीचे अॅक्सीलरेशन 6.7 सेकंद, तर XEV 9e साठी 6.8 सेकंद.
· फास्ट चार्जिंग: 175 kW फास्ट चार्जरसह 20%-80% फक्त 20 मिनिटांत.
· i-Link फ्रंट सस्पेन्शन आणि 5 लिंक रिअर इंडिपेंडंट सस्पेन्शनसह इंटेलिजेंट सेमी-अॅक्टिव्ह डॅम्पर्स.
· इंटीग्रेटेड इलेक्ट्रॉनिक बूस्टर (IEB) सह ब्रेक-बाय-वायर तंत्रज्ञान
· हाय पॉवर स्टिअरिंग आणि वेरिएबल गियर रेशो (VGR). त्यामुळे 10 मीटरचा टर्निंग सर्कल डायमीटर (TCD) मिळतो.
MAIA: महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजेंस आर्किटेक्चर जगातील सर्वात शक्तिशाली ऑटोमोटिव्ह माईंड
· सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल: इथरनेट बॅकबोनसह अत्याधुनिक डोमेन आर्किटेक्चरवर आधारित
· 220 k DMIPS, 80 अब्जांहून अधिक ट्रान्झिस्टर्स आणि 130 दशलक्षहून अधिक कोड लाईन्ससह 51 TOPS
· क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8295: ऑटोमोटिव्ह ग्रेडमधील सर्वात वेगवान चिपसेट.
· 24 GB RAM, 128 GB स्टोरेज आणि कॉकपीट डोमेन साठी अल्ट्रा-फास्ट 6th जनरेशन Adreno GPU.
· Wi-Fi 6.0, Bluetooth 5.2, आणि Quectel 5G कनेक्टिव्हिटी आणि रिअल-टाइम अपडेट्स
· ADAS L2+: 2 GB RAM आणि 8 MP कॅमेरासह Mobileye EyeQTM6चिप
· संगीत, मनोरंजन, ओटीटी चित्रपट, पॉडकास्ट, खरेदी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी 60 हून अधिक अॅप्स
· ओव्हर-द-एअर अपडेट्स BE 6e आणि XEV 9e यांना सतत अपग्रेड करण्यात मदत करतात.
हीरो फीचर्स
· XEV 9e मध्ये वाइड सिनेमास्कोप:110.08 सेमी रुंद आकर्षक दृश्य निर्माण करणारे तीन 31.24 सेमी स्क्रीन
· BE 6e मध्ये रेस-रेडी डिजिटल कॉकपिट.
· VisionX: ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड्स-अप डिस्प्ले (HUD).
· Infinity Roof आणि LightUpMe.
· Sonic Studio by Experience Mahindra: Dolby Atmos सह 16 स्पीकर Harman Kardon साउंड सिस्टम.
· LiveYourMood: प्री-सेट थीम (Calm, Cozy आणि Club) प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या सिग्नेचर धून, कस्टम ड्रायव्हर सीट, भरपूर प्रकाश आणि क्लायमेट कंट्रोल अॅडजस्टमेंट.
· मल्टी-ड्राईव्ह मोड्स: रेंज, एव्हरी डे आणि रेस
· ADAS Level 2+: प्राणी, पादचारी, अडथळे आणि विविध प्रकारची वाहने ओळखण्याची क्षमता असलेला 5 रडार्स आणि 1 व्हिजन कॅमेराने सुसज्ज
· EyeDentity: ड्रायव्हरचा थकवा तपासणारी ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टीम (DOMS). हे सेल्फी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलसाठी देखील वापरले जाऊ शकते.
· Secure360: 360-डिग्री कॅमेरा आणि इन-कॅबिन कॅमेरा वापरून आजूबाजूचे निरीक्षण करते आणि नोंदी वाहनात साठवते. मोबाईल अॅपद्वारे थेट दृश्य उपलब्ध करते.
· Autopark: 12 अल्ट्रासॉनिक सेन्सर्ससह 90 अंशात, अँग्युलर आणि पॅरलल पार्किंग सक्षम करते. यामध्ये रिव्हर्स असिस्ट आणि रिमोट-कंट्रोल पर्याय देखील आहेत.
आर्थिक वर्ष 22 ते आर्थिक वर्ष 27 या चक्रामधील (आधीच जाहीर केलेल्या) 16,000 कोटी रु. च्या एकूण गुंतवणुकीमधील 4500 कोटी रु. च्या निर्धारित गुंतवणुकीत पॉवरट्रेन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानासह दोन उत्पादन टॉप हॅट्स आणि उत्पादन क्षमता यांचा समावेश आहे.
महिंद्राच्या इलेक्ट्रिक ओरिजिन SUV साठी गो-टू-मार्केट धोरण जानेवारी 2025 च्या उत्तरार्धात टप्प्याटप्प्याने सुरू होईल. वितरणाची सुरुवात फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च 2025 च्या सुरुवातीस अपेक्षित आहे.
मालकी अनुभवाची पुर्नव्याख्या:
· खरेदीपूर्व ड्राईव्ह अनुभव मिळण्यासाठी लक्झरी आणि प्रीमियम ब्रँडमधील 500 तज्ञ
· महिंद्रा रिसर्च व्हॅली (MRV) मधून समर्पित पाठबळासह ग्राहकांच्या अखंड अनुभवासाठी सुमारे 400 टेक एक्स्पर्ट्स
· ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सद्वारे अखंड उत्पादन आणि मालकीचा अनुभव.
· CHARGE.IN: चार्जिंग अनुभव सुलभ करण्यासाठी 350 हून अधिक तज्ञ आणि उद्योगक्षेत्रातील पहिला रिलेशनशिप मॅनेजर यासह समर्पित चार्जिंग व्हर्टिकल