पुणे: आम्ही भारताचे लोक म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याला संविधानने दिलेल्या जबाबदारीबाबत तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांबाबत अभंग, पोवाडा, कविता, गाणी अशा विविध सांस्कृतिक कलांचं सादरीकरण तरुणाईने केलं. निमित्त होत संविधान दिनाचं; संविधान प्रेमी आयोजित जश्न-ए-संविधान या ओपन माईक उपक्रमाचे. हा उपक्रम 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वा. कलाकार कट्टा, गुडलक चौक, डेक्कन, पुणे येथे झाला.
संविधानाची मूल्ये जर प्रत्येक व्यक्तीला समजली आणि जर प्रत्येकाने आपले जीवन त्या मूल्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशात लोकशाही चिरंतन राहील या उद्देशाने हा उपक्रम राबविला, असे कार्यक्रमाच्या समन्वयक ॲड. मोनाली अपर्णा यांनी सांगितले.
मातंग एकता आंदोलन अविनाश बागवे, ऑल मेडिको पॅथि फेडरेशनचे डॉ. सुनील जगताप, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुक्ता कदम, सेवासदन संस्थेचे डॉ. फादर डिक्रूज, पर्यावरणावर काम करणारे डॉ. सोनाली तळावलीकर आणि प्रदीप घुमरे व मुव्हमेन्ट फॉर पीस अँड जस्टीसचे साजिद शेख यांनी संविधानानी दिलेली कर्तव्ये याबाबत मनोगत व्यक्त केले.
संविधानात असलेल्या मूल्यांचे बुकमार्क यावेळी उपस्थित सर्वांना देण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकपणे वाचन करून उपक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन विशाल बागुल यांनी केले.