पुणे- उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाखाचे सोने विक्रीला आलेल्या एका २५ वर्षाच्या तरुणाला हडपसर पोलिसांनी रंगेहाथ पकडले . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ .२५/११/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार तानाजी देशमुख व अमित कांबळे यांच्या बातमीदांरामार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/११/२०२४ रोजी मार्वेला आर्को सोसायटी, हडपसर मध्ये झालेल्या घरफोडीमधील आरोपी नामे अनिल मिनर्सिंग खडका सद्या रा. माळवाडी, हडपसर व मुळचा नेपाळ हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्याकरीता अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांना कळवुन सापळा रचला
अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी आरोपी अनिल मिनसिंग खडका, वय २५ वर्षे, रा. केशव चौक, यश हॉस्पीटलचे शेजारी, माळवाडी, हडपसर, पुणे हा संशयित रित्या आजुबाजुस पाहत स्मशानभुमीच्या दिशेने आल्याने त्यास युनिट ०५ चे पथकाने त्यास शिताफीने पकडले. त्यास पकडल्यापासुन त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये हात घालुन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याबाबत पोलीसांनी त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने मार्वेल आर्को सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सोन्याचे दागिने चोरी केले असुन ते दागिने मी विकण्याकरीता आलो आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्यांची अंगझडती घेवुन त्याचेकडे मिळुन आलेले सोन्याचे एकुण ग्रॅम १७३.५०० वजनाचे एकुण ११,५९,५००/- रु.किं. चे सोन्याचे दागिने असा हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १७८४/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५ (अ) मधील मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अनिल मिनर्सिंग खडका याने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याला हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरीता देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार, अमित कांबळे, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शुभांगी म्हाळसेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.