पुणे- “सामाजिक जीवनाला गतिमान करण्याचे काम हे संविधानाच्या माध्यमातून होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प करूयात तो अधिक महत्वाचा आहे असे प्रतिपादन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केले आहे.
“२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. २६ नोव्हेंबर या दिवशी भारतीय संविधान व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ “भारतीय संविधान दिन” देशभरात साजरा होत आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राज्यभर २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ना. श्री. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पुणे स्टेशन रोड, ससून हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, तसेच पुतळ्याच्या आवारामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत भारतीय संविधान दिन साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विचार मांडताना म्हणाले, भारतीय संविधानास आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाने भारतीय लोकशाहीला मूर्तिमंत स्वरूप देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीला मजबूत करण्याचे काम होत असून आपणही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे. क्रांतिसूर्य, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा. दीपक मानकर, माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष दत्ता सागरे, उपाध्यक्ष मुनीर सय्यद, सरचिटणीस महेश कुंभार, धनंजय पायगुडे, अमित जावीर, व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र किराड, फार्मसी सेल अध्यक्ष विनोद काळोखे, आयटी सेल अध्यक्ष मोहन मोरे, विद्यार्थी सेल अध्यक्ष शुभम माताळे, पुणे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, सांस्कृतिक सेल कार्याध्यक्ष अशोक जाधव, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कोथरूड महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, योगेश वराडे, उपाध्यक्ष डिंपल इंगळे, संघटक सचिव करुणा अंथानी, प्रवीण पवार, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, व्यापारी सेल उपाध्यक्ष विशाल आगरवाल, कोथरूड उपाध्यक्ष निलेश शिंदे, संघटक सचिव मुस्ताक शेख, महिला उपाध्यक्ष सुनिता चव्हाण, चिटणीस सुनिता बडेकर, पुणे कॅन्टोन्मेंट ओबीसी अध्यक्ष अतुल जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, फार्मसी सेल उपाध्यक्ष सनी किरवे, नवनाथ खिलारे, संदीप गाडे, शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, चिटणीस भारत पंजाबी, हनीफ शेख, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर, खडकवासला उपाध्यक्ष रोहिदास जोरी, चिटणीस शाम शेळके, संतोष हत्ते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.