मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२४
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन वाचन करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सोनू शुक्ला, सुभाष पाखरे, दत्ता नांदे, नामदेव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान साकारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी कटीबद्ध असून लोकशाही व संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या