पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज परिसरात एका तस्कराकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा पकडला. देव नरेश तनेजा (वय २४, रा. कात्रज) असे या तस्कराचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना बातमी मिळाली की, कात्रज येथील एकता मित्र मंडळ चौकात एक जण गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देव तनेजा याला पकडले. त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांज पकडण्यात आला असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा , अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे , पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड , सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली आहे.