हैदराबाद-कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले. त्यांना घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हैदराबाद येथे खासगी विमान पाठवले आहे.रविवारी सायंकाळी तेमुंबईकडे रवाना झाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचे विश्वासू आमदारम्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळखआहे. विधानसभा निवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहाती विजय मिळवला. हिंगोली येथे शनिवारी मारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरव बांगर यांना पोटात गोळी लागली. गौरव यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचारसुरु आहेत. त्यांच्या देखभालीसाठी आमदार बांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद येथेथांबले आहेत.
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश दिले. त्यांना हैदराबादयेथून मुंबईला येण्यासाठी खासगी विमानहीपाठविले. त्यामुळे दुपारी खासगी विमानहैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतरसायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवानाझाले. त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेशमिळाल्यामुळे आमदार बांगर यांची मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. मतमोजणीपुर्वीच आमदार बांगरयांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आताआमदारांना तातडीने मुंबईला बोलावले जातआहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगर यांनाही मुंबईला बोलावल्याने पुढील निर्णयाकडे हिंगोली जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.