कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटील विक्रमी मतांनी विजयी
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचे सर्व श्रेय नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह, जेपी नड्डाजी महाराष्ट्रातील जनतेचे आणि कोथरूडकर जनतेचे आहे, अशी भावना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. कोथरूड मधील विजयानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय हा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शाह, जेपी नड्डाजी, आमचे सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्रातील जनतेचे आहे. या विजयाने लोकसभा निवडणुकीतील कसर धुवून निघाली अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोथरुड मधील विजयाबद्दल बोलताना पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत कोथरूडकरांची मनापासून सेवा केली. कोथरुड मधील प्रत्येक कुटुंबाशी जोडला गेलो. त्यामुळे आजचा माझा विजय हा कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाचा आहे. कोथरूड मधील जनतेची पुन्हा त्याच जोमाने सेवा करेन, अशी भावना व्यक्त केली.