Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोविड-19 विषाणूच्या नवीन आणि उद्गामी प्रकारांविरुद्ध सतर्क आणि सज्ज राहणे महत्वाचे आहे: डॉ मांडविया

Date:

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशाच्या काही भागांमध्ये वाढत्या कोविड-19 प्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर कोविड-19 परिस्थिती आणि संनियंत्रण, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.  यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस पी सिंह बघेल आणि डॉ. भारती पवार, नीती आयोग सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल हेदेखील उपस्थित होते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री अलो लिबांग, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक, उत्तराखंडचे आरोग्य मंत्री धनसिंग रावत, बैठकीसाठी प्रत्यक्ष उपस्थित होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव, हरियाणाचे आरोग्य मंत्री  अनिल विज, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे, आसामचे आरोग्य मंत्री केशब महंता, झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता, पंजाबचे आरोग्य मंत्री डॉ बलबीर सिंग, दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज, हिमाचल प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ. (कर्नल) धनी राम शांडिल, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, तेलंगणाचे आरोग्य मंत्री दामोदर राजनरसिंह, मणिपूरचे आरोग्यमंत्री डॉ सपम रंजन, ओडिशाचे आरोग्यमंत्री  निरंजन पुजारी, पुद्दुचेरीचे प्रशासक रंगास्वामी, या बैठकीत सहभागी झाले होते. 

जगभरात चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिका  यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले आव्हान अधोरेखित करताना, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविड-19 च्या नवीन आणि उद्गामी स्ट्रेनविषयी सतर्क आणि सज्ज राहण्याचे, विशेषतः आगामी सणासुदीच्या काळात खबरदारी बाळगण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोविड अद्याप संपलेला नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. योग्य सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद नियोजनासाठी कोविड 19 प्रकरणे, लक्षणे आणि प्रकरणांची तीव्रता याबाबत उद्गामी पुराव्यांवर लक्ष ठेवण्याची विनंती मांडविया यांनी राज्यांना केली. 

डॉ. मांडविया यांनी “संपूर्ण सरकार” दृष्टिकोनाच्या भावनेने उदयोन्मुख परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे यावर भर दिला. भारतीय SARS-CoV-2 जनुकीय अभ्यास संघाच्या (INSACOG) माध्यमातून विषाणूच्या नव्या प्रकाराचा मागोवा घेण्यासाठी बाधीत नमुन्यांच्या संपूर्ण जनुकीय अनुक्रम तपासणीसाठी  पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश डॉ. मांडविया यांनी दिले. यामुळे देशात प्रसार होणारी विषाणूची नवीन रूपे वेळेवर ओळखता येतील तसेच सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी वेळेवर योग्य उपाययोजना करणे सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे तसेच कोविड-19 बाधीत रुग्णांचे आणि न्यूमोनिया सारख्या आजारांच्या रुग्णांचे नमुने जनुकीय अनुक्रम तपासणीसाठी दररोज INSACOG जनुकीय अनुक्रम प्रयोगशाळा (IGSLs) मध्ये पाठवावेत, जेणेकरून विषाणूच्या एखाद्या नवीन प्रकाराच्या प्रसाराचा मागोवा घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले यासोबतच विषाणूच्या प्रसारावर पाळत ठेवणे आणि औषधे, ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि लसींचा पुरेसा साठा सुनिश्चित करणे याबाबत सूचना दिल्या. पीएएस प्लांट्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि सिलेंडर्स, व्हेंटिलेटर इत्यादींच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य स्तरावर दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी सर्वोत्तम पद्धती सामाईक करण्याला प्रोत्साहन दिले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यांना  स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आणि वस्तुस्थितीनुसार योग्य माहितीचा प्रसार सुनिश्चित करण्याचे आणि खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी सूचनात्मक व्यवस्थापन करण्यासाठी आणि कोणतीही भीती पसरु नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.  केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वेळेवर देखरेख आणि सार्वजनिक आरोग्य उपायांना त्वरित सक्षम करण्यासाठी कोविड पोर्टलवर रुग्ण, चाचण्या, बाधीत होण्याचे प्रमाण इत्यादींची माहिती वास्तविक वेळेत सामायिक करण्याचे आवाहन केले. राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांनी एका सादरीकरणाद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना कोविड-19 ची जागतिक परिस्थिती आणि देशांतर्गत परिस्थिती याबद्दल माहिती दिली. अशी माहिती देण्यात आली की जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतात सक्रिय कोविड रुग्ण लक्षणीयरीत्या कमी असताना, गेल्या दोन आठवड्यांत बाधीत रुग्णांच्या संख्येत 6 डिसेंबर 2023 रोजी 115 वरून 614 इतकी वाढ झाली आहे, अशी माहिती या सादरीकरणात देण्यात आली. 92.8% रुग्ण त्यांच्या घरातच विलगीकरणात असून त्यांच्यात आजाराची सौम्य लक्षणे आढळली आहेत, हे देखील या सादरीकरणातून लक्षात आले आहे. कोविड-19 मुळे रुग्ण इस्पितळात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण इतर वैद्यकीय कारणांमुळे दाखल झाले असून त्या कारणांच्या तपासण्या दरम्यान रुग्णाला  कोविड-19 ची देखील बाधा झाल्याचे लक्षात आले आहे.  केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटक यासारख्या काही राज्यांमध्ये बाधीत रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ दिसून आली आहे.

SARS-CoV-2 विषाणूच्या नवीन JN.1 प्रकाराबद्दल बोलायचे झाले तर हा प्रकार सध्या तीव्र वैज्ञानिक छाननीखाली आहे, परंतु तो सध्यातरी चिंतेचे कारण नाही अशी माहिती देण्यात आली.  JN.1 मुळे भारतात कोठेही ठराविक एका क्षेत्रात अनेक रुग्ण आढळून आलेले नाहीत तर सर्व प्रकरणे सौम्य असल्याचे आढळून आले आणि ते सर्व बाधीत रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे झाले आहेत.

डॉ व्ही के पॉल यांनी कोविड बाधीतांच्या संख्येत वाढ आणि नवीन प्रकाराच्या उदयामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचा पुनरुच्चार केला. भारतातील वैज्ञानिक समुह विषाणूच्या नवीन प्रकाराची बारकाईने तपासणी करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय राज्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची आणि प्रसारावर पाळत ठेवण्याची प्रणाली मजबूत करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद सध्या नवीन JN.1 प्रकाराच्या जनुकीय अनुक्रम तपासणीवर काम करत आहे, अशी माहिती आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली. त्यांनी राज्यांना COVID-19 परिस्थितीचे निरीक्षण करण्याचे आणि RT-PCR चाचण्या वाढविण्याचे आवाहन केले परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे स्पष्ट केले.

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्राकडून मिळालेल्या पाठिंब्याची आणि मार्गदर्शनाची प्रशंसा केली.  काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन चाचण्या आणि पाळत ठेवण्याचे उपाय वाढवण्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव  एल एस चांगसान; आरोग्य मंत्रालय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...