पुणे, 19 डिसेंबर २०२३: मुलांमध्ये आढळणारा मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MISC) सारखी लक्षणे आणि गंभीर श्वसनविषयक परिस्थिति असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) मध्ये दाखल केल्यानंतर आता त्या मुलाच्या तब्बेतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
या लहान वयातील रुग्णाला सुरुवातीला ताप, पुरळ, पोटात दुखणे आणि जलद श्वासोच्छवासाचा त्रास जाणवला आणि त्यातून गंभीर चिंता निर्माण झाली. हडपसरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्याचा रक्तदाब खूप कमी झाला होता. जोडीला प्रचंड अशक्तपणा आणि प्लेटलेटची संख्या कमी होती. इंट्राव्हेनस फ्लुइड्स आणि कोलाइड तपासणी यासह तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. पुढील उपचारांमध्ये आयनोट्रॉपिक सपोर्ट, पॅक्ड सेल व्हॉल्यूम (पीसीव्ही) ट्रान्सफ्यूजन आणि डेंग्यू आणि टायफॉइड सारख्या संसर्गजन्य आजारांसाठी कठोर तपासणी यांचा समावेश होता.
एवढ्या परिपूर्ण, सर्वसमावेशक तपासण्या करूनही नेमके विशिष्ट कारण अस्पष्ट राहिले. उच्च ऑक्सिजनची आवश्यकता आणि दाहक मार्कर वाढल्यामुळे मुलांमधील मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MISC) चे निदान झाले. COVID-19 शी संबंधित असण्याची शक्यता होती. वैद्यकीय पथकाने रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून IVIG आणि स्टिरॉइड्स दिली. आयसीयू मध्ये जवळजवळ १० दिवसांनंतर, सर्वसाधारण ऑक्सिजन पातळी येऊन रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. हायपोटेन्शन, श्वसनाचा त्रास, उच्च कार्डियाक मार्कर (PROBNP), कोविड IgG चाचणीसह दीर्घकाळापर्यंत कोग्युलेशन मार्कर यांनी MISC ची पुष्टी केली आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. डॉ. बडगे म्हणाले, “या रुग्णाच्या केसमध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसत असल्यामुळे एक वेगळेच आव्हान निर्माण झाले होते. तज्ञांमधील सहकार्य आणि पुरवली गेलेली सर्वसमावेशक काळजी हा सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.”
रुग्णाची प्रकृती अधिक बिघडली असल्यामुळे स्टेरॉईड्स आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) पदेण्यात आले. वेंटिलेशनचे पाच दिवस आव्हानात्मक होते. रुग्णाला आराम मिळावा, त्याच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी या साठीच्या प्रवासात आत्यंतिक काळजी अंतर्भूत होती. फुफ्फुसाच्या जळजळीमुळे रुग्णाला गंभीर एआरडीएसचा (ARDS) (तीव्र श्वसनचा त्रास) होत होता. त्यात PEEP टायट्रेशन, रिव्हर्स IE गुणोत्तर प्रयत्न आणि निगेटिव्ह द्रव संतुलन साधणे यांचा समावेश होता. ४८ तासांनंतर, सुधारणेची चिन्हे स्पष्ट झाली. अधिक चांगले आर्टीअल ब्लड गॅस परिणाम आणि एक्स-रे प्रतिमांमधून हे दिसून आले.
मुलाला तीव्र वेंटिलेशनमधून सिंक्रोनाइझ्ड इंटरमिटंट मॅन्डेटरी व्हेंटिलेशन (SIMV) मोडमध्ये आणि त्यानंतर, हाय-फ्लो नेसल कॅन्युला (HFNC) मध्ये यशस्वीरित्या आणण्यात आले. सध्या सुरू असलेल्या आरोग्य विषयक सेवेत संपूर्ण बरे वाटण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत ओरल आणि फिजिओथेरपीचा समावेश आहे. दोन आठवड्यांच्या समर्पित वैद्यकीय सेवेनंतर छान बरे वाटलेल्या या रुग्णाला कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रुग्णालयातून सोडण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटल्समधील या प्रेरणादायी केसमधून बालरोगाच्या गंभीर परिस्थितीत त्वरित आणि पूर्ण काळजी घेण्याची किती आवश्यकता असते हे दिसून आले. लहान वयाच्या रुग्णाच्या तब्बेतीत पूर्णपणे सुधारणा होण्यात डॉ. गणेश बडगे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय कर्मचार्यांचे टीमवर्क हा महत्त्वाचा घटक होता.
मुलांमधील मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम समजून घेणे (MIS-C): MIS-C ही कोविड-19 नंतर मुलांमध्ये दिसून येणारी एक दुर्मिळ परंतु गंभीर गुंतागुंत आहे. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रतिक्रिया देते, शरीरावर हल्ला करते आणि मोठ्या प्रमाणावर जळजळ हा त्रास होतो तेव्हा असे होते. शरीराच्या वेगवेगळ्या प्रणालींवर परिणाम करणारी लक्षणे दिसून येतात. या प्रकारच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोविड-19 असलेल्या मातांच्या पोटी जन्मलेली नवजात मुले आता MIS-C ची लक्षणे दाखवत आहेत. त्यामुळे नियमित अँटीबॉडी तपासण्यांशिवाय निदान आव्हानात्मक होते. विशेषत: नवजात मुलांमध्ये MIS-C समजून घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन महत्त्वाचे आहे.