पुणे –
काँग्रेस सरकारने त्याठिकाणी जनतेला आश्वासन देऊन ते सत्ते मध्ये आले पण मागील दोन वर्षात कोणत्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही.काँग्रेसने ज्या दहा आश्वासनांचा जाहीरनामा दिला ते खोटे निघाल्याने जनतेला धोका निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचारी यांना पगार मिळत नाही, पेन्शन दिली जात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासन मध्ये नाराजी आहे. सत्ता काँग्रेसने मिळवली पण सत्ता चालवणे त्यांना अवघड झाले आहे असे मत हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण , कर्नाटकचे माजी मंत्री नारायण गौडा, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेलंगणा राज्यातील खासदार डी. के. अरुणा , भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणतात, काँग्रेस नेत्यांनी प्रत्येक महिलेस दर महिना १५०० रुपये देण्याची घोषणा केली, पाच लाख युवकांना रोजगार दिला जाईल, एक लाख सरकारी पदे भरली जातील ,प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल पण कोणत्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र मध्ये येऊ नये अशी आमची इच्छा आहे जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा.
कर्नाटक मध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण म्हणाले, महाराष्ट्र मध्ये निवडणूक होत असून काँग्रेसने वेगवेगळी आश्वासने जनतेला दिली आहे. पण मागील १८ महिन्यापासून काँग्रेस सरकार कर्नाटक मध्ये असून त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे. अनेक भ्रष्टाचार घोटाळे देखील होताना दिसत आहे. अवैधरित्या भूखंड बळकावणे आणि त्यानंतर गवगवा झाल्यावर परत केले जातात यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील सहभागी आहे. त्यांच्यावर न्यायालयाकडून याबाबत गंभीर गुन्हे दाखल आहे. तेलंगणा निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारने ८७ कोटी रुपये बेकायदेशीर हस्तांतरित केल्याचे देखील घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस भ्रष्टाचार मध्ये बुडलेले असून महाराष्ट्र मधील निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारचे पैसे वापरले जात आहे. राज्यात विकास ठप्प झाला असून काँग्रेस सरकार मधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहे.
तेलंगणात महालक्ष्मी योजनेस काँग्रेसकडून हरताळ
खासदार डी. के. अरुणा यांनी सांगितले की, तेलंगणा मध्ये काँग्रेसने निवडणूकवेळी सहा गॅरंटी जनतेस दिल्या. शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्ज माफी घोषणा केली, शेतकरी आणि कामगार यांना. आर्थिक साह्य करू सांगितले. महिलांना दर महिना २५०० रुपये देऊ अशी महालक्ष्मी योजना सांगितली, प्रत्येक महाविद्यालयनी तरूणीस इलेक्ट्रिक दुचाकी देऊ म्हणाले, बेरोजगार भत्ता देऊ पण कोणत्याही आश्वासनाची पूर्तता सत्तेत आल्यापासून ११ महिन्यात केली नाही. तरी मुख्यमंत्री देशात दुसऱ्या राज्यात जाऊन आश्वासने पूर्ण केल्याचा खोटा प्रचार करत आहे.