पुणे:येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदा 55 दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठ्या (स्लिप) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे दृष्टिहीन मतदारांना मतदान प्रक्रियेत सुलभता मिळेल. दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी संदीप चौगुले, समन्वयक विनोद हाके आणि सहाय्यक अधिकारी प्रदीप पारखी, प्रविण गायकवाड आणि राजेंद्र तिडके यांनी याबद्दल माहिती दिली.पुढे बोलतांना श्री. हाके म्हणाले की,या मतदारसंघात 960 दिव्यांग मतदार असून, त्यातल्या 16 दिव्यांग मतदारांना आजपासून (13 तारखेसून) घरी जाऊन मतदान घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे दिनांक 13 आणि 14 नोव्हेंबरला पहिली भेट नियोजित केलेली आहे आणि पहिल्या भेटीत मतदार उपस्थित नसेल तर दुसरी भेट 15 नोव्हेंबरला नियोजित केलेली आहे आणि इतर दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी वाहतूक व्यवस्था केली गेली आहे.तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतदान कक्षाचे कामकाज नोडल अधिकारी श्रीमती दीपगौरी जोशी आणि श्रीमती किशोरी शिंदे बघत आहेत. मतदारसंघात
85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 5849 आहे. यापैकी 54 जण घरून मतदान करतील, जे आजपासून सुरु झालेले आहे (13, 14 नोव्हेंबरला पहिली भेट नियोजित केलेले आहे आणि पहिल्या भेटीत मतदार उपस्थित नसेल तर 15 नोव्हेबरला दुसऱ्या भेटीचे नियोजन केलेले आहे )आणि या कामाचे समन्व्यक म्हणून लौकिक दाभाडे काम बघत आहेत.तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार सचिन आखाडे, अंकुश गुरव आणि मनुष्यबळ विभागाचे साहीर सय्यद ह्यांचे सहकार्य यासाठी मिळाले आहे. या सर्व सोयींमुळे दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी मतदान प्रक्रियेत सहजता आणली आहे.
भारत निवडणूक आयोगाने (ECI) एक विशेष टपाल मतपत्रिका सेवा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 40% किंवा त्याहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरबसल्या मतदान करता येते. खडकवासला विधानसभा मतदारसंघात या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
हृदयस्पर्शी उदाहरणे म्हणजे, निवडणूक अधिकाऱ्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या जेष्ठ अनेक विकारग्रस्त नागरिकांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांना घरीच मतदानाची संधी दिली. निवडणूक आयोगाच्या या उपक्रमामुळे शारीरिक मर्यादा असतानाही प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता येईल याची खात्री मिळते.