पुणे- निवडणुकांच्या गंमती जमती फार असतात,कुठे राग असतो,कुठे मत्सर असतो तर कुठे अस्तित्वासाठी धडपड देखील असते.सुदैवाने पुण्यात राग,मत्सर दिसत नसले तरी अस्तित्वासाठी धडपड मात्र दिसते सर्वात महत्वाचे दिसते ती न्यायासाठी होत असलेली तडफड..बस हि एकदा नजरेत आणून दिली कि भल्या भल्या कार्यकर्त्यांचे बंद देखील पडते थंड..कारण त्यात राग व मत्सर कुठे नसतो…
देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पुणे भेटीच्या दरम्यान त्यांनी आज अनेक इच्छुक असलेल्या पण उमेदवारी न देता आलेल्या किंवा पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून महत्वाचे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या अर्थात अशा सर्व कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना तुम्ही विमानतळावर या तुमची मी भेट घडवून आणतो असा निरोप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला होताच.पण जर देवेन्द्रजी हे,याच्या घरी, त्याच्या घरी जाऊ शकतात, हेलीकॉप्टर कुणाला पाठवू शकतात तर..आपल्या घरी का येऊ शकत नाहीत ? आपल्याला बाहेर विमानतळावर का बोलाविले जाते ? ज्यांना उमेदवारी मिळालीय काही पडे मिळालीत ते जातील तिकडे हा भाव बहुतेकांच्या कडून व्यक्त होत होता जो केंद्रीय मंत्र्याच्या पुढे व्यक्त होत होता.अशाच सर्व राजकीय वातावरणातून सनी निम्हण, धीरज घाटे,श्रीनाथ भिमाले यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस पुणे कॅन्टोन्मेंट मधील बंड करायला थंड..गेले डॉक्टर भरत वैरागेंच्या घरी..गेली कित्येक वर्षे भाजपचा हा जुना कार्यकर्ता.३ टर्म नगरसेवकपद घरात असलेला.सदैव लोकसभा,विधानसभा आणि महापालिकेला आपल्या भागातून भाजपाला मताधिक्य मिळवून देणारा कार्यकर्ता…साहेब ..कायम त्याच त्याच लोकांना पुढे नेले जातेय,आमच्या कामाकडे दुर्लक्ष होतेय,अन्याय होतोय आमच्यावर…
बस एवढेच बोलतो अन…साहेब हसतात, पाहू आपण या पुढे लक्ष घालू..करू आपण काही तरी..तुम्ही सोडा हट्ट,आम्ही आहोत ना.. एवढेच बोलतात आणि अर्ज माघारीच्या निर्णयाला..ह्म्म्म याला म्हणतात कार्यकर्ता..असे संबोधत थोड्या वेळाने निघूनही जातात.
पुणे कॅन्टोन्मेंट मधीलच बंड नव्हे तर अशा पद्धतीने अनेकांची नाराजी दूर करण्याचे काम आजच्या दौऱ्यात फडणविसांनी केले तर आहे.आता नेमके मतदार काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी २० तारीख आणि नंतर २३ तारीख उजाडून द्यावी लागणार आहे.