पुणे- लोकांना त्रास देणारा बिल्डर नको,गुन्हेगार नको,युवकांचे घोळके घेऊन फिरणारा दहशत निर्माण करणारा नको एक सयंमी शांत स्वभावाचे नेतृत्व हवे,जे स्वतः हि शांत राहील आणि आपला परिसरही शांत ठेवण्याचा प्रयत्न करेल अशा दृष्टीकोनातून मिळणारी साथ घेऊन प्रचाराची यंत्रणा राबवणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर आता खडकवासल्याचा आमदार आता मंत्री होणार अशा अपेक्षेला तोंड देत घरोघरी फिरताना दिसत आहेत.या उलट ज्यांचा त्यांनी गेल्या निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभव केला होता त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मात्र गेल्यावेळेची स्थिती आता उरली नसल्याचे दिसते आहे.
खडकवासला मतदार संघातील उमेदवारी जाहीर करताना महायुती आणि आघाडी या दोहोंनाही उशीर झालेला.तोही याच कारणाने आघाडी नेमकी याच प्रश्नावरून साशंक होती कि आता सचिन दोडके यांची गेल्यावेळेची हवा अजूनही कायम आहे कि ती सुटली आहे. पण नेमके ते नेत्यांना समजू शकले नाही आणि दोडके यांना उमेदवारी देण्या शिवाय गत्यंतर उरले नाही.बाळा धनकवडे,प्रसन्न जगताप सारखे चांगले कार्यकर्ते रांगेत होते. ज्यांच्यामुळे लोकसभेला सुप्रिया सुळेना या मतदार संघातून चांगली मते मिळाली होती.त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.
तशा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही गोष्टी खडकवासलाच्या दृष्टीने अलग मानल्या जातात.खडकवासला विधानसभा बारामती लोकसभेत आल्याने लोकसभेला त्याला पवारांच्या प्रतिभेची, नेतृत्वाची किनार लाभते मात्र विधानसभेला स्थानिक शांतता,संयमता याला इथले मतदार अधिक प्राधान्य देतात.यावेळी मयुरेश वांजळे सारखे उमेदवार देखील आपण जिंकण्यासाठी मैदानात असल्याचे सांगत आहेत.पण विद्यमान आमदारांशी त्यांची लढत होईल कि आघाडीच्या उमेदवाराशी त्यांची लढत होईल हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
कोथरूड मतदार संघात ज्यांनी भाजपच्या सहायाने शेकडो कोटीच्या इमारती उभारल्या,आपल्या मोकळ्या जागा भाजपच्या नेत्यांना प्रचारासाठी देखील दिल्या तेच आघाडीचे पुढारी येथे भाजपच्या विरोधात आहेत हे गणित इथल्या मतदारांच्या डोक्यावरून जाणारे आहे. निव्वळ जागा बळकावणे,योग्य अयोग्य न पाहता बांधकामे करणे ती करताना वाहतुकीचा विचार न करणे,राजकारणाचा उपयोग अशा व्यवसायासाठी करणे हे इथल्या पुढाऱ्यांचे मूळ धोरण हि मतदार ओळखून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अखेरीस तापकीर उजवे ठरत असल्याचे प्रचार यंत्रणेतूनच स्पष्ट होताना दिसत आहे. आणि आता चौथ्यांदा जर निवडून आले तर आपल्या मतदार संघातला आमदार मंत्री होईल आणि अनेक सुविधा सहज सुलभपणे उपलब्ध होऊ शकतील हि धारणा देखील मतदारात आहे. ज्याला प्रचार यंत्रणा सामोरे जाताना दिसते आहे.एकूणच यावेळी चौथ्यांदा तापकीर बाजी मारणार कि अजितदादा सोडून गेल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याबाबतची सहानुभूती दोडके यांच्या कामी येणार हे मात्र मतदानातूनच स्पष्ट होणार आहे.