पुणे :
दिवाळी सणानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून पुणे आर्टिस्ट ग्रुप आणि मित्रपरिवारच्या वतीने भोर तालुक्यातील धानवली,दुर्गाडी(मानटवस्ती),उबार्डे(उबार्डेवाडी),आशिंपी या दुर्गम भागात मिठाई,ब्लँकेट,पुस्तक आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांनी त्यात पुढाकार घेतला.
चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्यासह सिकंदर रणवरे,सचिन पडवळ,महेश तेनकाळे,नितीन थोरात,योगेश गुजर,सौरभ वावळ,स्वामी धुमाळ,मयूर शिळीमकर,वनाजी साटोटे, विलास मतगुडे,जय कुडपणे,करण कुडपणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.वैभव मिठारे,सुजित काळे,अबीर मिठारे,प्रभास काळे,विजय धनावडे,धनश्री काळे,रणधीर खवले,अजय दळवी,श्री.टिके,गंगादास मच्छा,कुणाल बेलदरे,सुनीता राव,देवयानी नलावडे,स्वप्नील कुयटे,सनी कुडपणे,अनिकेत देशमुख,स्वाती जराडे,पौर्णिमा वाळुंज,पूर्णिमा गोरडे,स्नेहा नवरे,आकाश कुडपणे,नितीन फडणीस,योगेश गायकवाड,अस्मिता देशपांडे,रामदास कांबळे,संजय गरुड,रीना शहा,रवी गायकवाड,महेंद्र थोपटे,धनंजय कोटकर,शोभा रायकर यांनी सहभाग घेतला.या ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.
या ग्रुप तर्फे दरवर्षी विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असा उपक्रम आयोजित केला जातो.दिपावली सणानिमित्त भोर तालुक्यातील धानवली,दुर्गाडी(मानटवस्ती),उबार्डे(उबार्डेवाडी) आणि आशिंपी या दुर्गम भागात पायाभूत सुविधांची कमतरता असतानाही हा उपक्रम आयोजित केला गेला.निसर्गाच्या सानिध्यात राहणारी माणसं कोणत्याही अपेक्षेशिवाय निरपेक्ष भावनेने एकमेकांशी आणि निसर्गाशी जुळवून आपले जीवन जगत असताना त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य उमलावं या हेतूने प्रयत्न करण्यात आले’,असे सुरेन्द्र कुडापणे-पाटील,वैभव मिठारे,सुजित काळे यांनी सांगितले.