पुणे- : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हडपसरच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने मतदारसंघातील जनतेसोबत दुचाकी यात्रेच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या भव्य यात्रेत हजारो नागरिकांनी उपस्थित राहून चेतन तुपे यांच्या नेतृत्वाला आपला भरभरून पाठिंबा दर्शवला. “हडपसरच्या प्रगतीला गती देण्यासाठी जनतेच्या विश्वासाचे बळ आणि पाठबळ हेच माझे खरं सामर्थ्य आहे,” असे भावनिक उद्गार आमदार चेतन तुपे यांनी या प्रसंगी काढले.या दुचाकीयात्रेची सुरुवात बी.टी.कवडे रोड पासून झाली. पुढे भीमनगर, मुंढवा, केशवनगर, झेड कॉर्नर, मांजरी गाव, महादेवनगर, 15 नंबर चौक, रविदर्शन, माळवाडी, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, शनि मंदिर, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, चिंतामणीनगर, श्रीराम चौक, काळेपडळ, ढेरे कॉंक्रिट, श्रीराम मंदिर, सातवनगर, श्रीराम चौक, महमंदवाडी या मार्गावरून झालेल्या या रॅलीला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व महिलांनी ठिकठिकाणी चेतन तुपे यांचे जल्लोषात स्वागत केले, औक्षण करून, पुष्पवृष्टी करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
हडपसरच्या प्रगतीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या विकासकामांवरही तुपे यांनी या प्रसंगी प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “हडपसरचा विकास फक्त घोषणांमध्ये मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावा म्हणून माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीच या यात्रेचे आयोजन केले असून त्यातूनच हडपसरची प्रगती साधता येईल.”
याप्रसंगी महायुतीमधील सर्व सहकारी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. “माझ्या मार्गदर्शनाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघातील विकास अधिक गतिमान होईल अशी मला खात्री आहे,” असे सांगून त्यांनी भावी योजनांचे वर्णन केले.“नाळ मातीशी – हडपसरच्या प्रगतीशी” हे सूत्र घेऊन चेतन तुपे यांनी या यात्रेतून जनतेपर्यंत आपली विचारधारा पोहोचवली. जनसामान्यांचा विश्वास, त्यांची साथ आणि पाठिंबा हा हडपसरच्या प्रगतीचा मुख्य आधार असून या विश्वासाच्या बळावरच हडपसर अधिक प्रगत आणि सुखी करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.