पुणे-
मुंबई -बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नवले ब्रीज परिसरात बुधवारी एक क्रेन (एमएच०६ एएल ४१३५) व ट्रक (एमएच २५ एजी १००५) या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या दोन वाहनात दोन व्यक्ती अडकल्याची माहिती पीएमआरडीए नांदेड सिटी अग्नीशामक केंद्रास मिळाली. त्यानुसार अग्नीशामक दलाच्या जवानांनी रेसक्यु वाहनासह घटनास्थळी धाव घेत स्प्रेडर कटर व कटावणीच्या सहाय्याने एक मयत व्यक्ती व दोन व्यक्तींना जखमी अवस्थेत बाहेर काढले.
रुग्णवाहिका व पोलिसांच्या मदतीने दोन जणांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.यावेळी घटनास्थळी दोन क्रेन व पीएमसी अग्नीशामक दलाची तीन वाहने उपस्थित होते. अग्नीशामक दलाच्या जवानांना जखमी व्यक्तीने सांगितले की, ट्रकचा वाहनाचा ब्रेक झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या क्रेन वाहनाला जाऊन धडकून भीषण अपघात झाला. अग्नीशामक दलाचे जवान प्रेमसागर राठोड, मंगेश साळुंखे, प्रतीक शिरसाट, साईनाथ मिसाळ , शुभम माळी हे जवान उपस्थित होते.

