पुणे, दि. ३० ॲक्टो. – पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – कांग्रेस – शिवसेना आणि मित्र पक्ष महाविकास आघाडी उमेदवार सौ.अश्विनी नितीन कदम यांच्या पर्वतीतील निवडणूक कचेरीचे उद्घाटन आणि महाविकास कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी मुख्य कचेरीचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष राजाराम कांबळे, आपचे उपाध्यक्ष कुमार घोंगडे आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अनंतराव गाडगीळ, काँग्रेस नेते अभय छाजेड, माजी नगरसेवक अण्णा माळवतकर, अजित दरेकर, बाळासाहेब ओसवाल अशोक हरणावळ, बंडू नलावडे, राहुल तुपेरे, राष्ट्रवादी ऍड सेलचे भगवानराव साळुंखे, पंडितराव साबळे, नरेंद्र व्यवहारे, सुनील जगताप, किशोर कांबळे, स्वाती पोकळे, मृणालिनी वाणी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकीतील वाढता प्रचार आणि जनतेची असलेली अपेक्षा पाहता, यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट करत निवडणुकीतील विजयी रणनीती आणि एकजुटी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना महाविकास आघाडी आणि फ्रंट इंडिया उमेदवार
अश्विनी नितीन कदम बोलताना म्हणाले की, मी जन्माने आणि कर्माने पर्वतीकर आहे. पर्वतीकारांचे प्रश्न, त्यांचे मूलभूत हक्क अधिकार, समस्यांची जाण आणि शिक्षिकेचा धर्म असल्याने नगरसेवक या नात्याने माझ्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. पंधरा वर्षात 15 ही कामे नागरीकांना दाखवता येतील असे विद्यमान लोकप्रतिनिधीना करता आले नाहीत. करोनासारख्या महामारीत कुटुंब संकटात असताना घरात न बसता कार्यकर्त्यांच्या साथीने आणि मदतीने नागरिकांसाठी अहोरात्र धावून गेले. मागील निवडणुकीत पराभव झाला तरीही माझ्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अखंडपणे कार्यरत आहे. परंतु विद्यमान लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या प्रश्नापेक्षा ज्या कामात फायदा आहे असेच कामे मार्गी लावणे जमत. मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आम्हालाही मोठ्या प्रमाणात अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु निष्ठेला महत्त्व असल्याने पितृतुल्य पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच पक्षाने पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी यावेळी शिवसेना सोबत असल्याने महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाची एकजूट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या साथीने इतिहास घडणार परिवर्तन होणार.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक काँग्रेस अध्यक्ष शशिकांत तापकीर यांनी केले. महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.