पुणे : खडकवासला विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे. तर याआधी मनसेने दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे . गेल्या अनेक दिवसांपासून खडकवासला मतदारसंघामध्ये मोठा सस्पेन्स पाहायला मिळत होता. विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांची उमेदवारी गॅसवर असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण खडकवासला आणि वडगाव शेरी हे मतदासंघ भाजप आणि अजित पवार गट अदलाबदल करून घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र दादांनी पुन्हा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देत या चर्चांणा पूर्णविराम दिला.आता खडकवासला मतदासंघाध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहेय. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भीमराव तापकीर आणि सचिन दोडके हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात एकदम काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या सचिन दोडके यांचा या निवडणुकीमध्ये अवघ्या २५९५ मतांनी पराभव झाला होता. आता शरद पवार गटाकडून सचिन दोडके यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आहे. त्यासोबतच मनसेकडून मुयुरेश वांजळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कांटे कि टक्कर आता सॉफ्ट दिसली तर नवल वाटणार नाही . खडकवासल्यातील परिस्थिती आता बदललीय. शरद पवारांची पुण्यातील उमेदवारी देतानाची गणिते कुठे कुठे बरोबर तर कुठे चुकलीत असे अनेकांना वाटते आहे . अजितदादा गट बरोबर नसताना येथे पवार गटाचे अनेक नाराज आहेत . आणि बिल्डर लॉबी लोकांना राजकारणात नकोशी झाली आहे .या पाश्वभूमीवर येथील उमेदवारीत सस्पेन्स पाहायला मिळाला तसा मतदानात हि पाहायला मिळेल असे दिसते आहे.