Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वडगाव शेरी एकेकाळचे ७०० घरट्यांचे गाव. पुणे शहराजवळ असूनही शहराचा गंध न लागलेले….

Date:

शरद पवारांनी का दिली बाप्पू पठारेंना उमेदवारी, महेंद्र पठारे ,भैय्या जाधव यांनी पठारे यांचा लेखा जोखा …

महाराष्ट्रातील राजकारणात पुणे जिल्ह्याचा आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पूर्व पुण्याचे महत्त्व नव्याने अधोरेखित करण्याची गरज नाही. गेल्या अनेक दशकांपासून बापूसाहेब पठारे यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या भरीव कामगिरीमुळे तसेच दांडग्या जनसंपर्काच्या माध्यमातून पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केलेले आहे. खराडी, चंदननगर, वडगाव शेरी एकेकाळचे ७०० घरट्यांचे गाव. पुणे शहराजवळ असूनही शहराचा गंध न लागलेले. आज या भागाचा कायापालट झाला आहे. बापूसाहेब पठारे याच भागात जन्मले, वाढले आणि पुढे या भागाचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारे नेतृत्व झाले.
वडील कै. तुकाराम पठारे, थोरले बंधू श्री. पंढरीनाथ पठारे यांच्याकडून लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाले होते. त्याच शिदोरीवर परिसरातल्या नागरिकांची लहानसहान कामे करत करत आमदारकी पर्यंतची मजल त्यांनी मारली. १९९५ साली खराडी गावचा सरपंच हा पहिला टप्पा. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पुणे महापालिकेचा दोन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष आणि वडगाव शेरी मतदारसंघाचा आमदार असा राजकीय प्रवास आजवर त्यांनी केला आहे. बापूसाहेब पठारे हे स्वतः ग्रामीण भागात वाढलेले असले, तरीही जाणत्या वयापासून त्यांनी कायमच आपल्या भागाची तुलना शहराच्या विकसित भागाशी केली. आपला भागही ग्लोबल बनवायचा, हे त्यांना पडलेले एक स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करणे त्यांना शक्य झाले आहे, असे म्हणता येईल. ग्रामीण भाग म्हणून गणल्या गेलेल्या खराडी- चंदननगर परिसराचा झालेला विकास, तो सगळ्यांच्या नजरेसमोर आहेच. येथे असलेली शिक्षण संकुले, खराडीचे आयटी पार्क, पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स याने या भागाचे रंगरूप पालटले. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. हा परिसर ग्लोबल बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी येथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केले.


सरपंच म्हणून केलेले काम असो, वा जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि विधानसभेच्या माध्यमातून केलेले काम असो, त्यांनी सातत्याने नागरिकांच्या प्रयत्नांना शाश्वत आणि दीर्घकालीन उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. येथील जटील असलेला पाणीप्रश्न सोडवल्यामुळे माता-भगिनींचे आशिर्वाद त्यांना लाभले. परिसरातील रस्ते, ड्रेनेज, पाणी व वीज या मूलभूत सोयी-सुविधांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. या कामांसाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि चिवटपणे ते प्रश्न मार्गी लावले.
पद कोणतेही असो त्यांच्यातील सामान्य नागरिकांसाठी झगडणारा कार्यकर्ता सतत जिवंत असल्याने परिसराच्या प्रश्नांबाबतही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. केवळ आपल्या परिसराचाच नव्हे, तर शहराचाही विचार आमदार या नात्याने त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या काळात केला. स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना मिळालेली अनुभवाची शिदोरी त्यांना यासाठी उपयुक्त ठरली. शहराचा सर्वकष विकास करीत असताना युवकांना रोजगार देणे, शहरातील वाहतुकीची समस्या सोडविणे, झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे मिळवून देणे, महिलांचे सक्षमीकरण या साऱ्या बार्बीच्या पूर्ततेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि आजही करत आहेत.गेली अनेक दशके पूर्व हवेली (पुणे) मध्ये राजकारणात ते स्वतः आणि कुटुंबातील सदस्य सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका व प्रभाव राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. आजच्या घडीला खराडीतील आयटी पार्क मध्ये ४ लाखाहून अधिक जण आयटी क्षेत्रात काम करतात. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात बापूसाहेब पठारे यांनी दूरदृष्टी ठेवून मोठे योगदान दिले. यासोबतच स्थानिक तरुणांसाठी यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. संपूर्ण पूर्व पुण्यासाठी पाणी प्रश्न हा गंभीर होता. त्यावर उपाय म्हणून भामा आसखेड प्रकल्प सुरू करण्यापासून त्यातील पाणी पूर्व पुण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी बापूसाहेब पठारे यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले. यासाठी केवळ राज्यच नाही तर केंद्रीय पातळीवरील मान्यता आणण्यासाठी त्यांनी चिवटपणे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळत नव्हते. राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर बापूसाहेब पठारे यांनी आपले राजकीय कसब पणाला लावत तब्बल सात नगरसेकवक एकहाती महानगरपालिकेत निवडून आणले व राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवून दिली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. नागरिकांशी थेट संपर्क आणि कार्यकर्त्यांची बांधलेली मोट, प्रदीर्घ राजकीय प्रवासादरम्यान पूर्व पुण्यातील प्रत्येक कुटुंबासाठी कुठल्या ना कुठल्या रुपात केलेल्या कामामुळे जोडले गेलेले ऋणानुबंध यामुळे पूर्व पुण्यातील राजकारणात त्यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे. विधानसभा सदस्यत्वाच्या काळात पुणे शहरात असणाऱ्या एकूण ८ आमदारांपैकी, बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांचा बालेकिल्ला असलेल्या खराडीतील प्रभागामध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर तसेच जास्तीतजास्त मताधिक्याने निवडून आणण्यात बापूसाहेब पठारे यांनी निर्विवाद यश मिळवले. आजपर्यंत भूषवलेली पदे व जबाबदाऱ्या २००९-२०१४- महाराष्ट्र विधानसभा सदस्य २००७ साली पुण्यामध्ये सर्वाधिक मते मिळवत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. याच वर्षी त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचाही बहुमान मिळाला. २००२ साली पुणे महानगरपालिका निवडणुकीत उतरून त्यांनी प्रभाग क्रमांक ३ येथून पुण्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत नगरसेवकपदावर नाव कोरले, तर २००६-०७ साली त्यांना पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी बढती मिळाली. २००० साली, पुण्यातील खराडीस्थित विकास प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. तर २००१ साली त्यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात यासाठी कल्पवृक्ष महिला उन्नती केंद्र सुरू केले. १९९६-९७ साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले तसेच त्याच वर्षी पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९९६ मध्ये पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावर निवडून येत त्यांनी जिल्हा पातळीवरील राजकारणात प्रवेश केला. १९९६ मध्ये त्यांच्याकडे काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान, खराडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. १९९५ मध्ये त्यांना खराडी-चंदननगरच्या सरपंचपदाचा बहुमान मिळाला. १९९४ मध्ये खराडी- चंदननगर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी राजकीय वाटचालीची सुरुवात यशाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...