जेधे फाऊन्डेशनच्या उपक्रमाने उजळली वंचितांची मने !
पुणे :
जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि श्री शिव छत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट(पुणे) या संस्थेच्या वतीने.मुळशी तालुक्यातील भोडे गावालगत असणाऱ्या दुर्गम अशा ४ कातकरी पाड्यांवर दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले. दिवाळी सण साजरा करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूचा समावेश त्यात होता. एकूण ४५ कुटुंबांना सरंजाम वाटप करण्यात आले.दि. २३ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम अध्यक्ष कान्होजी दयानंद जेधे यांच्या पुढाकाराने झाला. यावेळी नंदकुमार जाधव, रवींद्र पठारे,जयराज वाडेकर,अभिषेक गोळे,राजवीर जेधे,उमेश सपकाळ हे उपस्थित होते.या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते
‘अन्न,वस्त्र,पाणी,निवारा नसताना प्रतिकूल निसर्ग,दैनंदिन अडचणीना तोंड देत हलाखीची परिस्थिती जगणाऱ्या वंचितांची दिवाळी करण्यासाठी आम्ही सर्व जण पायवाटा तुडवत दुर्गम भागात पोचलो.अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा सण साजरा करण्यासाठी आणि माणुसकीचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला’,असे कान्होजी दयानंद जेधे यांनी सांगितले.जेधे मॅन्शन,गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिराजवळ(पुणे ) येथे असणाऱ्या या मंडळाला समाजभूषण आप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव जेधे यांचा वारसा आहे.अनेक पुरस्कार या मंडळाला मिळाले आहेत. विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात.
*माणुसकीचा धागा जोडणारा दिवाळी सरंजाम*
जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि श्री शिव छत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट या संस्थेच्या वतीने.देण्यात आलेल्या दिवाळी सरंजाममध्ये २ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो बेसन,डालडा ,तेल,मैदा,भाजके पोहे,फुटाण्याची डाळ,चकली भाजणी,खोबरे गोटा,मीठ,पिठी साखर,चिवडा मसाला,मोती साबण,उटणे,सुगंधी तेल,४ पणत्या,आकाश कंदील,फटाके,लाईट माळ ,रांगोळीचे रंग,रांगोळी स्टिकर,लक्ष्मी पावले,अत्तर,देवतांच्या तसबिरी,फुलांचे तोरण यांचा समावेश होता.