बीग बॉस फेम सुरज चव्हाणच्या राजाराणी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे ॲड. वाजिद खान यांची मागणी

Date:

बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा नुकताच प्रदर्शित झालेला राजा राणी हा चित्रपट समाजासाठी घातक असून यान चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाळीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी  श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.

ॲड. खान असे म्हणाले की सध्या सुरज चव्हाण हे प्रसिध्द व्यक्तिमत्व महाराष्ट्रात गाजत असून राजा राणी हा त्याचा  चित्रपट पाहुन अनेक तरुण तरुणी आत्महत्या करु शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे की समाज व नातेवाईकांमुळे  चित्रपटातील दोन प्रेमी एकत्र होवू शकत नाहीत, म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचे पाऊल एकमेकांच्यावर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. असा चुकीचा संदेश चित्रपटाच्या सरते शेवटी देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे.

सध्या सुरज चव्हाण हे महाराष्ट्रातील प्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतील. ह्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सुरज चव्हाण यांचा राजा राणी हा चित्रपट बॅन करण्यात यावा अशी मागणी प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील, अभिनेत्री वैष्णवी शिंदे सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...