मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा
पुणे: रविवारी रात्री साडेअकरा वाजता मंडई मेट्रो स्टेशन वर किरकोळ आग लागल्याने तातडीने अग्निशामक दलाने 5 बंब पाठवून तातडीने आग विझवली.
अधिक माहिती अशी समजते की, जिथे कन्स्ट्रक्शन चेच काम सुरू आहे तिथे वेल्डिंग काम सुरू असताना फोम च्या साठ्यात ठिणगी उडाली आणि धूर पसरला, धूर बाहेर जाण्यास फारशी जागा नसल्याने तो साठला. मात्र तिथे प्रवासी येत जात नाही असे सांगण्यात आले.


या संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात आली आहे, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही , मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्री. श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

