दौण्ड : ॲड राहुल कुल,चिंचवड : शंकर जगताप,भोसरी : महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर
उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कामठी येथून निवडणूक लढवणार
पुणे-कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे पर्वतीतून माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे .
भाजपाच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार
- दौण्ड : ॲड राहुल कुल
- चिंचवड : शंकर जगताप
- भोसरी : महेश लांडगे
- शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे
- कोथरुड : चंद्रकांतदादा पाटील
- पर्वती : माधुरी मिसाळ
- सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख
- अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी
- सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख
- मान : जयकुमार गोरे
- कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले
- सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
- कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक
- इचलकरंजी : राहुल आवाडे
- मीरज : सुरेश खाडे
- सांगली : सुधीर गाडगीळ
रविवारी भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 99 नावे आहेत. 13 जागांवर महिलांना तिकीट देण्यात आले आहे. 6 जागा एसटीसाठी आणि 4 जागा एससीसाठी आहेत.
कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे पर्वतीतून माधुरी मिसाळ यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे .तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी जाहीये झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून तर नितीश राणे यांना कणकवलीतून तिकीट मिळाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द न केल्याने नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. नितेश राणे सध्या मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.








