सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Date:

पुणे, दि. १९: खडकवासला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, मतदारसंघाच्या प्रशिक्षण कक्षप्रमुख तुषार राणे, संजय भोर आदी उपस्थित होते.

डॉ. माने यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार यादी अद्ययावत करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मतदान केंद्रावर करण्यात येणाऱ्या किमान सुविधांनुसार कार्यवाही करावी, मतदार ओळख चिठ्ठीचे वेळेत वितरण करावे, अशा सूचना डॉ. माने यांनी केल्या.

प्रशिक्षक श्री. राणे आणि श्री. भोर यांनी मतदानाच्या दिवशी करावयाचे नियोजन, संपर्क आराखडा, स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती, मतदार चिठ्ठीचे वितरण, आदर्श आचार संहितेचे पालन, मतदार यादी अद्ययावतीकरण आदीबाबत माहिती दिली. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या भूमिका, निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या आव्हानांविषयी माहिती दिली.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...