खासगी, सार्वजनिक जागेवर निवडणूक प्रचारसाहित्य लावण्यास निर्बंध
पुणे, दि. १८: जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही निवडणूक संबंधी साहित्य रहदारीस अडथळा होईल व अपघात होईल असे लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डींग्ज, कमानी आदी रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल व अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यावर निर्बंध घाण्यात आले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खासगी, सार्वजनिक जागेवर निवडणूक प्रचारसाहित्य लावण्यास निर्बंध
विधानसभा निवडणूक कालावधीत खासगी व्यक्तींच्या जागेवर व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जागेवर संबंधितांच्या परवानगी शिवाय निवडणूक प्रचाराचे साहित्य लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरीता कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकीच्या परवानगी शिवाय व संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

