निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका महत्त्वाची:जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Date:

पुणे, दि. १६: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदार संघनिहाय माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांनी निरपेक्ष व पारदर्शकपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे, सहायक संचालक जयंत कर्पे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जनमानसामध्ये प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम माध्यम कक्षामार्फत केले जाते. निवडणूक प्रक्रियेत माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती खूप महत्त्वाची असून या समितीमार्फत राजकीय पक्ष, उमेदवार यांना सर्वच माध्यमांद्वारे जाहिरात प्रसारणासाठी पूर्व परवानगी दिली जाते. तालुका स्तरावरील माध्यम कक्षांनी पेड न्यूज, वृत्त वाहिन्यावरील जाहिराती, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या समाज माध्यमांवरील पोस्टवर बारकाईने लक्ष देणे, निवडणूक प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या वृत्तांचे तात्काळ खंडन करणे, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे व्यक्तिगत चारित्र्य हनन, समाजामध्ये द्वेष, तेढ निर्माण करणाऱ्या अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट, बातम्या, प्रचारावर लक्ष ठेऊन त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हास्तरीय माध्यम कक्षाच्या निदर्शनास आणून देणे तसेच चुकीच्या बातम्यांचे तातडीने निराकरण करावे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही डॉ. दिवसे यांनी दिल्या.

ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर भारत निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असते. निवडणूक प्रक्रिया महत्त्वाचे कार्य असून या प्रक्रियेत वैयक्तिक हितसंबंधाला महत्त्व देता कामा नये. जिल्ह्यात ८७ लाख मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा बारकाईने अभ्यास करुन जागरुकपणे आपापली जबाबदारी पार पाडावी, असेही ते म्हणाले.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माध्यम कक्षाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचार-प्रसिद्धीच्या खर्चावर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीमार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. या समितीमार्फत जाहिरातींच्या प्रसारणासाठी पूर्व प्रमाणिकरण आवश्यक असून राजकीय पक्षांना सर्वच माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी या समितीमार्फत पूर्व परवानगी दिली जाते असे सांगून सर्व विधानसभा मतदार संघ स्तरीय माध्यम कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पेड न्यूज व समाजमाध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या संदेशांबाबत सतर्क रहावे असे आवाहन केले. बैठकीला माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती सदस्य आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विक्रांत मंडपे व दैनिक सकाळचे पत्रकार अनिल सावळे तसेच विधानसभा मतदार संघाचे माध्यम कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड,भोसरी व पिंपरीतील वीजपुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये रविवारी (दि.१५) रात्री ११.१० वाजेच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला आहे. परिणामी या अतिउच्चदाब रोहित्रावर अवलंबून असलेला ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला असून भोसरी व पिंपरी विभागातील वीज ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे महावितरणने या भागातील वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. बाधित भागाची नावे- •             एस ब्लॉक •             जे ब्लॉक •             डी २ ब्लॉक •             एफ २ ब्लॉक •             टी ब्लॉक •             इंद्रायणीनगर •             भोसरीगाव •             जलवायू विहार •             गंधर्व नगरी •             सेक्टर ६,४ •             नेहरू नगर •             संत तुकाराम नगर •             दापोडी •             कासारवाडी पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न दि. ०२ फेब्रुवारी,२०२६ महापारेषण कंपनीच्या  याच २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्र अंतर्गत बिघाड झाला होता. त्यावेळी देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  करण्यात आले होते. सद्यस्थितीत देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  सुरुच आहेत. दिवसभरात इतर वीजवाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. परंतु, अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यावरही महावितरणकडून त्वरित उपाय योजना करण्यात येईल. वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन अचानक उद्भवलेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनीही महावितरणला सहकार्य करावे, विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावा

पुणे - प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने...

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा पण भाजपाला एक्सपोज करणे मी थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

देशातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टिपू सुलतानच्या...

टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे दिली जातील:हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार

सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचाही उल्लेख संविधानातच टिपू...