पुणे :
बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळ तर्फे देण्यात येणारा ‘कार्यगौरव पुरस्कार’ पुण्यातील गौरी-कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे यांना जाहीर झाला आहे.कै.पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या ‘ज्योतिर्विदांचा मेळावा ‘ मध्ये हे पुरस्कार वितरण बुधवार,१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.ज्योतिष मेळाव्याच्या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ उद्योजक अशोक चोरडिया ,समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदकुमार कुलकर्णी यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे .
आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे या ‘केपी बेसिक अँड एडव्हान्स’,मोबाईल न्युमेरॉलॉजी रेमेडिज, मेडिकल न्यूमेरोलोजी, क्रिस्टल या विषयाच्या मार्गदर्शक आहेत.गौरी कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आहेत. ‘मोबाईल न्यूमरोलॉजी’,’सुलभ केपी’,’ क्रिस्टल्सच्या अद्भुत दुनियेत’,’फलादेशाचे तंत्र (उपयुक्त पायऱ्या)’ या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत.