श्री महालक्ष्मी मंदिरासमोर प्रतिकात्मक रावण दहन 

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृती
पुणे :  महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण, नशाखोरी, वृद्धांची उपेक्षा, बेरोजगारी, भेदभाव यांसह विविध दहा सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जीवंत प्रसंग देखील सादर करण्यात आला. 
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात आले. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड यांसह आमदार माधुरी मिसाळ देखील यावेळी उपस्थित होत्या.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच नारी शक्तीचा सन्मान देखील करण्यात आला. यंदा आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमात देखील महिला अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्यांच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली:खासदार रवींद्र वायकरांनी दिली माहिती

मुंबई-मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच...

नागपूरने 63.03 दशलक्ष टन वार्षिक कोळसा उत्पादनाचा गाठला टप्पा

मुंबई-  नागपूरच्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (डब्ल्यूसीएल) आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान कोळसा उत्पादन, कोळसा वाहतूक...

फलटण – पंढरपूर या 109 किमी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले पूर्ण

भारतीय रेल्वेने लातूर येथे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी (एमआरसीएफ)...

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम यांनी आज...