–शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
पुणे : शिक्षणातून विद्यार्थी घडतात, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत यामुळे राज्यकर्त्यांनी लाडका विद्यार्थी योजना राबविण्याची गरज आहे, परंतु आज मतदानाच्या प्रक्रियेत प्राथमिक शाळेचे विद्यार्थी जे देशाचे भवितव्य आहेत, ते येत नसल्याने राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे च्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त साने गुरुजी स्मारक येथे विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधानांचे अभ्यासक प्रा. सुभाष वारे, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर, प्राचार्य वृंदा हजारे, मुख्याध्यापिका मीरा काटे, पर्यवेक्षक जीवन इंगळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आपला देश आज विविध पातळ्यांवर प्रगती करत आहे, मात्र सामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ज्या गरीबी मुळे अडचणी येतात ती गरीबी काही कमी होत असल्याचे दिसत नाही. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेला हा शिष्यवृत्ती उपक्रम अतिशय चांगला आहे, त्याला मिळणारी नागरिकांची साथ ही अत्यंत मोलाची आहे. आज राष्ट्रीय एकात्मतेचा एक चांगला अनुभ या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने आला. सर्व जाती – धर्मातील गरीब विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली गेली याचे समाधान वाटते.
प्रा. सुभाष वारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जो वर्ग आर्थिक प्रगती करत आहे त्यांनी ‘ पे बॅक टू सोसायटी’ हे ध्यानात घेऊन नाही रे वर्गाला मदत केली पाहिजे तर महात्मा गांधी यांनी भांडवलदारांना तुम्ही मालक नाही तर विश्वस्त या नात्याने संपत्ती जमवली पाहिजे असे म्हटले होते. या महापुरुषांच्या, आपल्या संताच्या शिकवणीनुसार आजचा उपक्रम खांडेकर यांनी राबविला आहे, या कार्यक्रमातून सामाजिक कृतज्ञतेची भावना व्यक्त होते.
शिवाजी खांडेकर म्हणाले, प्रतिष्ठानच्या वतीने आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबता आहोत. आज २६ विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देत आहोत पुढील वर्षी ही संख्या शंभरच्या पुढे नेण्याचा आमचा मानस आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन मीनाक्षी संगारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता उद्योगपति रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.
चौकट
शिष्यवृत्ती व शिष्यवृत्ती धारकांची नावे
एस.एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय – मीराताई काटवटे पुरस्कृत – हाफिजुल रेहमान रईन
राजा धनराज गिर ज्युनिअर कॉलेज – राधाबाई इंगळे पुरस्कृत कै. लक्ष्मण इंगळे स्मरणार्थ समृध्द जीवन शिष्यवृत्ती – श्रेया रितेश भिसे
मोलेदिना माध्यमिक विद्यालय – अविनाश संगारे, भाई संगारे फाऊंडेशन, पुणे पुरस्कृत पँथर शहीद भाई सांगरे शिष्यवृत्ती – उमर गुलामअली खान, ९ वी
लक्ष्मणराव आपटे ज्युनिअर कॉलेज – शिवाजी खांडेकर पुरस्कृत – स्मृती सुमित ओव्हाळ, ११ वी – अधिनी कदम पुरस्कृत – सुहानी रुपेश चव्हाण, १२ वी – ज्ञानेश्वरी रीटे, १२ वी
खंडोजी बंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय, धायरी – वाळाराम धुलप पुरस्कृत – श्रध्दा सिध्देश्वर माळी, १० वी
नु.म.वि. मुर्तीची प्रशाला – श्रीमती संगीता गोवळकर पुरस्कृत – गायत्री संतोष बागवे, १० वी
आबासाहेब गरवारे कॉलेज – श्रीमती विद्या नांदुलकर पुरस्कृत – वैभव बाळू कांबळे
रावसाहेव पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज – मंगलताई जाधव पुरस्कृत – अनन्या संदिप दामले, ९ वी – पौर्णिमा मनोज सर्वगोड, ८ वी
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय-डॉ. प्रिया निघोजकर पुरस्कृत-नेहाल तसोवर हुसेन, ९वी – कल्पना शेरे पुरस्कृत- ऋषिकेश राजेंद्र जगताप, ९वी
एम व्ही एम रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय – शोभा खांडेकर पुरस्कृत – अनुष्का वसंत डोंगरे १० वी – शंतनू खांडेकर पुरस्कृत – सोनाक्षी किशोर देवकर ९ वी
सुंदरदेवी राठी हायस्कूल – विनोद गोरे पुरस्कृत – राजवीर सतीश परदेशी, ९ वी
सेंट हिल्डाज हायस्कूल – राकेश नेवासकर पुरस्कृत – समृध्दी दीपक क्षत्रीय, ९ वी
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वारजे – देवेंद्र पारखे पुरस्कृत – मिताली दत्तात्रय निक्षे, १० वी
बनकर विद्यालय, सुखसागर नगर, कात्रज – सुभाष तांबे पुरस्कृत – कोमल तानाजी होगडे, १२ वी
हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय -डॉ. गोवर्धन पांडुळे पुरस्कृत कै. गोविंद पांडुळे स्मरणार्थ- धनश्री हरिभाऊ कन्हाळे, ९वी
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळा – सुखदेव कंद पुरस्कृत – श्रेयस अजय कांबळे, ८ वी
अशोक विद्यालय – श्रीमती मेधा गोरे पुरस्कृत – कार्तिक राजेंद्र गायकवाड, ९ वी
समाज भूषण बाबुराव फुले माध्यमिक विद्यालय – प्रसन्न कोतुळकर पुरस्कृत – नेहा लक्ष्मीपुत्र गौर, १० वी
राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय – किशोर मुथा पुरस्कृत – निकिता गणेश वाघमोडे, ९ वी

