टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं,संस्मरणीय-शरद पवार
मुंबई–देशातील ख्यातनाम लौकिकप्राप्त प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.
टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं, संस्मरणीय -शरद पवार
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
-शरद पवार (ज्येष्ठ राजकीय, सामाजिक नेते )
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना वयाच्या २१ व्या वर्षी १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात ‘लिस्टेड’ झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.
\ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी X वर लिहिले, ‘श्री रतन टाटा जी एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व प्रदान केले. याव्यतिरिक्त, त्याचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजात सुधारणा करण्याची अटळ बांधिलकी यामुळे ते अनेकांना प्रिय झाले.
रतन टाटा आपल्या प्रोफेशनल लाइफबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींवरूनही बरेच चर्चेत होते. रतन टाटांनी सांगितलं होतं की, ते एकदा नव्हे तर चारदा प्रेमात पडले होते. एकदा तर ते बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांनी आपल्या प्रेमाबाबत २०११मध्ये सांगितलं होतं. वर्ष १९७०मध्ये त्यांचे आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांची रिलेशनशिप चांगलीच चर्चेत होती.
विशेष म्हणजे सिमी ग्रेवाल यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यात खूप घट्ट नातं होतं. दोघांना अनेकदा एकत्र बघितलं गेलं होतं. दोघेही एकमेकांशी विवाह करू इच्छित होते, परंतु त्यांच्या नशीबात एकमेकांशी विवाहाच योग नव्हता. दोघांनीही आपल्या अफेरबाबत सर्वांसमोर मान्य केलं होतं. त्यानंतर पुढे सिमी ग्रेवालने रतन टाटांशी ब्रेकअप झाल्यानंतर रवी मोहन यांच्याशी विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तसेच त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, रतन टाटा एक परफेक्ट जंटलमन आहेत, ते खूप विनम्र आहेत आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर खूप चांगला आहे.
ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते. रतन टाटांचे शालेय शिक्षण मुंबई झाले होते. त्यांनी कॉर्नेल यूनिवर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस आणि हार्वर्ड बिजेनसस्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम असं शिक्षण घेतलं होतं.रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. ते १९९१मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर समूहाचे पाचवे अध्यक्ष बनले होते. रतन टाटा यांना वर्ष २०००मध्ये पद्मभूषण आणि २००८मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस सारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले होते. त्यांनी नॅनो सारखी कार बनवून सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होतं. याशिवाय त्यांनी इंडिका सारखी प्रसिद्ध कारही बाजारात आणली होती.रतन टाटा हे जेव्हा टाटा समूहात आले होते, तेव्हा कंपनीची एकूण उलाढाल एक हजार कोटी रुपये होती. तर २०११-१२मध्ये समूहाचा महसूल ४७५.७२१ कोटी रुपये झाला होता. टाटाने विकसित देशांमधील अनेक अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले ज्या त्यांच्या देशात सुपर ब्रॅण्ड होत्या. आज टाटा समूहाचे जाळे जगभरात पसरलेले आहे. रतन टाटा यांनी त्यांचा दोन दशकांहून अधिकच्या कारकिर्दित टाटा समूहाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्यांचे पंचतारांकीत हॉटेल लक्ष्य केले गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली होती. ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते. ते जखमी कर्मचाऱ्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. त्यांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच नाहीतर आसापासच्या हातगाडीवाल्यांनाही मदत केली होती. २००२मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी रतन टाटांनी पहिल्यांदा निवृत्ती घेण्याचे जाहीर केले होते, मात्र तेव्हा त्यांना कंपनीने निवृत्त होवू दिले नव्हते. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती आल्यावर कंपनीने सेवानिवृत्तीचे वय ७५ वर्षे केले होते. त्यानंतर २८ डिसेंबर २०१२ रोजी निवृत्त झाले होते.

