पुणे-“सांस्कृतिक वार्तापत्र दिवाळी अंक म्हणजे संघ शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेली मानवंदना होय” असे उदगार सांस्कृतिक वार्तापत्र चे संपादक मिलिंद शेटे यांनी काढले.”सांस्कृतिक वार्तापत्र “च्या कार्यालयात दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी मिलिंद शेटे बोलत होते.ह्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे रा.स्व.संघ माणूस घडवणारी संघटना हे ब्रीदवाक्य घेऊन अंकाची रचना तीन भागामध्ये केली गेली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सरसंघचालक हे सर्वोच्च पद आहे.संघाच्या पाच सरसंघचालकांच्या जीवनाचा मागोवा ह्या अंकातील पहिल्या भागात घेतला आहे.त्यांचा व्यवहार सर्वसामान्यांशी किती आत्मियतेचा होता.तसेच ते आपल्या साध्या राहणीतून आणि निर्मळ वागण्यातून कसे जगायचे याचे शिक्षण अतिशय सहजपणे देत असत.हे यातून वाचायला मिळते.दुसऱ्या भागात नव्वद ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या संघकार्याच्या आठवणीचे संकलन प्रकाशित केले आहे.शेवटच्या भागात प्रचारक ही कॉन्सेप्ट कशी असते, चालता बोलता संघ म्हणजे संघ प्रचारक तसेच संघात गायिली जाणारे पद्य,संघ – गीते,संघकार्य वाढीमध्ये वहिनींचे योगदान,आणीबाणीत संघाचे योगदान ह्या विषयावर प्रकाश टाकलाआहे.सेवा कार्य, धर्म जागरण,सामजिक समरसता इ विषयावर तज्ञ व अनुभवी अभ्यासकांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे हे सांगण्यासाठी समाजामध्ये चालतांना,बोलतांना ह्या अंकाचा सर्वांना उपयोग व्हावा, ह्यासाठी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकाशनप्रसंगी ज्येष्ठ प्रचारक व सांस्कृतिक वार्तापत्र चे सल्लागार शशिकांत उर्फ भाऊराव क्षीरसागर,संपादक मिलिंद शेटे,ज्येष्ठ स्वयंसेवक सतीश आठवले,बापूराव कुलकर्णी,व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर,सहसंपादिका मेघना घांग्रेकर यांची मुख्य उपस्थिती होती.
यावेळी उल्हास सावळेकर,प्रकाश देशपांडे,कुलदीप धुमाळे,विवेक बाकरे,अरुण तुळजापूरकर,सुरेश गोरे उपस्थित होते.
“महाराष्ट्र व गोव्यातील सर्व खेद्यापड्यापर्यंत जाणारे हे एकमेव पाक्षिक असून दरवर्षी २० नियमित अंक व दोन विशेषांक प्रसिद्ध करणाऱ्या सांस्कृतिक वार्तापत्राचे २६ हजार वर्गणीदार,२२ हजार ग्रामपंचायती,दोन हजार वाचनालये,तीन हजार नियतकालिके,सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मिळून असे ५३ हजार अंकाचे नियमित वितरण होते.चार लक्ष वाचक सांस्कृतिक वार्तापत्र नियमित वाचतात” अशी माहिती व्यवस्थापिका सूनिता पेंढारकर यांनी यावेळी दिली.
रा.स्व. संघ – माणूस घडवणारी संघटना दिवाळी अंकासाठी ब्रीद वाक्य घेऊन केली रचना – मिलिंद शेटे
Date: