पुणे- पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीची चर्चा आता अंतरराष्ट्रीय स्तरावर झाडते आहेच. त्यातच चंदन नगर पोलिसांनी चक्क एका भिकाऱ्याला पकडले आहे… होय हा भिकारी .. चोर निघाला .. आता पुणेकरांना भिकाऱ्यांपासूनही सावध राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पोलिसांनी सांगितले कि,’
चंदननगर पोलीस ठाण्यात गु.रजि, नं. २४६/२०२४, भादवि कलम ३८० प्रमाणे उघड्या दरवाजावाटे घरात घुसुन सोने व रोख रक्कम चोरी झालेबाबत दाखल असलेल्या गुन्हयामधील आरोपींचा व चोरीस गेले मालाचा तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर व तपास पथकातील अंमलदार यांवेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत होते. चोरीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे लाल रंगाचे चारचाकी टेम्पो सारख्या गाडीचा व चोरी करणारे महिला व इसम यांची माहिती प्राप्त झाली होती.सहायक पोलीस निरीक्षक अर्थात सपोनि खांडेकर हे तपास पथकातील अंमलदार यांचेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रालिंग करत होते त्याच दरम्यान पो. हवा नाणेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली की, मागील दोन/तीन महिन्यापुर्वी पैसे व सोने चोरी करणारे फुटेजमधील वर्णना सारखी महिला व इसम हे आळंदी देवाची येथे एका लाल रंगाचे चार चाकी टेम्पो सारख्या गाडीसह उभे आहे. ही बातमी मिळाल्याने तपास पथकाकडील अंमलदार व महिला स्टाफ असे बातमीचे ठिकाणी रवाना होवुन त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मिली दिपक पवार, वय २० वर्षे, रा. आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक व एक विधिसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे असलेल्या महिंद्रा गाडी बाबत विचारपूस करता त्यांनी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पुढील कार्यवाही करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे सोने व पैसे मिळून आल्याने त्यांना सदर सोने व पैशांबाबत विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले कि, सदरचे सोने व पैसे हे आम्ही दि. १८/०८/२०२४ रोजी टिंबर मार्केट, पुणे येथे एका घरातून चोरी केले असलेबाबत सांगितल्याने सदरबाबत खडक पोलीस स्टेशन अभिलेखावर पाहणी केली असता, खडक पो. स्टे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर २७६/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचेकडे चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं.२४६/२०२४ भा.दं.वि कलम ३८० या गुन्हया बाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मागील ३ महिन्यापुर्वी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ३५,लाख रू किंमतीचे ५२ तोळे वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने तसेच २६,६००/- रू. रोख रक्कम, व ५,५०,०००/- रू किंमतीची महिंद्रा ईम्पेरिओ कंपनीची लाल रंगाची चारचाकी गाडी असा एकुण ४०,७६,६००/- (चाळीस लाख, शहात्तर हजार सहाशे) रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.हि कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो.स्टे.पुणे शहर संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिल माने, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शितल वानखेडे, पुजा डहाळे, मनिषा पवार, यांनी केली आहे.

