जम्मू येथे संपन्न झालेल्या 36व्या सब जुनियर राष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष पुणेवार याने आपला सहकारी नैतिक वर्मा याचा अंतिम फेरीत 21 – 19, 21 -18 असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेचे एकेरीतील विजेतेपद मिळवले. त्याआधी उपांत्य फेरीत उत्कर्ष पुणेवार याने तमिळनाडूच्या पी. बाला दर्शन याचा 21- 13 , 21 -14 असा सरळ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर नैतिक वर्मा याने केरळच्या अदियांद टी याचा 21 – 7 ,21- 9 असा सरळ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. याबरोबरच मुलांच्या सांघिक स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा 3-0 असे हरवून ब्राॅझ पदक पटकावले. मुलींच्या दुहेरीत ईशीका मिश्रा व अंकीता बोंबाटे यांनी चतुर्थ क्रमांकावर तसेच मिश्र दुहेरी मध्येही कृष्णा चिलेवार व आस्था मिश्रा या जोडीने तामिळनाडूच्या एस.अंबुसेलवन व आर.सुदार यांचा 21-17, 21-15 असा पराभव करून ब्रांझ पदक पटकावले.संघाचे व्यवस्थापक चंद्रकांत पिंपळे .यशवंत वेदपाठक तसेच प्रशिक्षक महेश पोहेरवार व सौ.स्नेहा खोंड यांचे व संघाचे सचिव महाराष्ट्र टेनीक्वाईट असोसिएशन श्री.अनिल वरपे यांनी अभिनंदन केले.