पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
X या समाज माध्यमावरील चित्रफीत संदेशात पंतप्रधानांनी लिहिले :
“वाशिममध्ये, बंजारा संस्कृतीत विशेष स्थान असलेल्या नगारा वादनाचा आज स्वतः अनुभव घेतला. आगामी काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.”