एस.बी.पाटील पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
पुणे (दि.15 डिसेंबर 2023)- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. ‘ऐस द रेस’ या विषयावर बालवर्ग, ‘अंतहीन प्रवास’ आणि ‘इतिहास के पन्ने से’ या विषयावर अनुक्रमे तिसरी ते पाचवी, सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांनी नाट्यछटा, गाणी, नृत्य सादर केली.
बालवर्ग ते इयत्ता दुसरी, तिसरी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते अकरावी अशा तीन विभागात तीन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाला विद्यार्थी पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीईटी परिसर प्रमुख प्रताप देवकर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाव्दारे भारतीय संस्कृती, इतिहासाची ओळख !!!
Date:

