शिरोळे यांच्या विशेष प्रयत्नांमधून पहिल्या टप्प्यांत ७० सार्वजनिक शौचालयांची कामे होणार पूर्ण
पुणे, दि. ३ ऑक्टोबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष प्रयत्नांनी मतदार संघातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची अनेक कामे सुरु आहेत. शिरोळे यांनी आज स्वत: विविध ठिकाणी भेट देत या कामांची पाहणी केली.
टॉयलेट पाहणी अभियान या शिरोळे यांनी मतदार संघात हाती घेतलेल्या उपक्रमानंतर विविध ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था खराब असून सामान्य नागरिकांना अडचणी येत असल्याचे लक्षात आले व त्यांच्या दुरुस्तीची काम सुरु करण्यात आली.
शिरोळे यांनी आपल्या प्रयत्नांमधून निधीची उभारणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यांत ७० शौचालयांची दुरुस्तीची कामे सध्या सुरु आहेत. या दुरुस्त्यांमध्ये शौचालयांमध्ये पाण्याची सोय करणे, पाण्याची टाकी उभारणे, गरज असल्यास बोअर उभारणी, शौचालयातील भांडी, टाईल्स, नळ बसविणे, बाहेरील व आतील बाजूने रंगरंगोटी करणे, विजेची सोय करणे अशा अनेक कामांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात खडकी, मुळा रस्ता, भोसलेवाडी, पुलाचीवाडी, १२०२ वसाहत, गोखलेनगर, पाटील इस्टेट, भैया वाडी, चाफेकर नगर, वडारवाडी, औंध, बोपोडी, चिखलदरा या भागांत असलेल्या शौचालयांची पाहणी आज करण्यात आली. शिवाय चिखलवाडी व सॅपरस खडकी येथे २ नवीन शौचालयांची उभारणीही करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी शिरोळे यांच्या विशेष प्रयत्नांमधून १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या दुरुस्तीच्या कामांनंतर स्थानिक नागरिकांना दिलास मिळून त्यांना लवकरच स्वच्छ शौचालये वापरायला मिळतील, असा विश्वास यावेळी शिरोळे यांनी व्यक्त केला.